Jamin Kharedi : कोणतेही क्षेत्र हे त्याच्या चतूर्सिमा पाहूनच ओळखले जाते आणि नेमकी याच ठिकाणी अनेक शेतकरी, सामान्य कुटुंब फसतात. अनेकदा तहसिलदारांकडून (Tahsildar) या बाबी समजून घेता येतात, सोडविता येतात.
रस्ता हा एन ए प्लॉटला (NA Plot) अधिकृत व सक्तीने दिलेला असतो आणि त्याचा ले आऊट असल्याने शक्यतो अडचण येत नाही, परंतु मंजूर १५-२० फूट असतो आणि ठेवला मात्र १० फूट जातो. त्यामुळे यावर खरेदी वेळी लक्ष असणे आवश्यक आहे.
रस्ता नसल्यास आपल्याला तहसीलदार रस्ता देण्यासाठी (Land Buying) बांधील असतो. रस्ता हा एक आपला मूलभूत अधिकार आहे, पण सजगते अभावी अनेक सदस्य आजही रस्त्यापासून वंचित आहेत. आपण मामलतदार कोर्ट ॲक्टचे कलम ५(२) नुसार जुना वहिवाट असलेला रस्ता खुला करून मागू शकतो किंवा लँड रेव्हेन्यू कोडचे कलम १४३ नुसार नवीन रस्ता खुला करून मागू शकतो.
जुन्या वहिवाट असलेले रस्ते खुले करणे एक आव्हान असते, पण नवीन रस्ता मात्र तहसीलदार, शहानिशा करून, स्थळ निरीक्षण करून, नकाशे, उतारे पाहून देऊ शकतात. दोन्ही (वहिवाट असलेला व नवीन रस्ता) मात्र सर्वस्वी रस्ता केस चालून, आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या हरकती लक्षात घेऊन दिला जातो. रस्त्यासंदर्भात शासनाने पाणंद रस्ते, चारीचे, पाट पाण्याचे रस्ते खुले करून देण्याची मोहीम राबवली होती, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा.
शेतजमीन खरेदीवेळी भावकीचे अंतर्गत रस्ते असतात आणि आपण तिथे नवीन गेल्याने ते रस्ते आपल्याला वापरास बंद होतात. त्यामुळे अधिकृत बोलूनच खरेदी करावी व होणाऱ्या त्रासापासून वाचावे. रस्ता हा दैनंदिन जीवनात महत्वाचा भाग असल्याने खरेदी वेळीच सजग राहावे.
- अॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर