Jamin Kharedi : खरेदीखत वेळी आपण जी प्रॉपर्टी खरेदी (Property Buying) करतोय, ती कोणत्या स्वरूपाची आहे, याचा आपण विचार करायला हवा. त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रॉपर्टी या पाहायला मिळतात. आपण थोडक्यात विविध प्रकार जाणून घेऊया.
प्रॉपर्टी कोणत्या झोनमध्ये येते....
आपण खरेदी करत असलेली प्रॉपर्टी कोणत्या झोनमध्ये (Property Zone) येते. याचा तपास करायला हवा. अर्थात बऱ्याच वेळेस आपण प्रॉपर्टी खरेदी करताना शासन दरबारी वर्गवारी केलेली असते. त्याला आपण झोन म्हणतो. काही झोनमध्ये बांधकाम करणे शक्य होत नाही. रहिवासी झोनमधील प्लॉटवर बांधकाम करणे सोपे असते. अन्य झोनमधील प्लॉटवर विविध नियमावलीचे पालन करावे लागते. यासाठी आपण कोणता झोन आहे, या संदर्भात आपल्या परिसरातील नगररचना टाऊन प्लॅनिंग ऑफिसमध्ये हा दाखला घेतला पाहिजे.
शेती खरेदी करत असेल तर
आपण शेती खरेदी करत असेल तर सातबारा, शहरातील प्लॉट घर जागा असेल तर प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत पत्रिका गावाकडील घर असेल तर तिचे नगर भूमापन विभागाकडून, सर्वेक्षण नोंद झाली नसेल तर आठ अ ऊतारा, खरेदीखत सर्च रिपोर्ट, जागेची मूल्यांकन, प्रॉपर्टीचे वारस यादी हे सर्व तपासले पाहिजे. आपला प्लॉट एन ए असल्यास त्यावर कर्ज मिळते, बांधकाम परवानगी लवकर मिळतात.
प्रॉपर्टी एन ए असल्यास
प्रॉपर्टी एन ए असल्यास तसा दाखला नगररचना विभागातून प्राप्त करता येतो. एन ए असल्यावर त्याला प्रॉपर्टी लेआउट मिळतो आणि आपली जागा नेमकी कोठे आहे. याबाबतीत माहिती मिळते. तसेच आपल्याला अधिकृत रस्ता देखील उपलब्ध असतो. आपण अम्युनिटी किंवा ओपन स्पेस चा भाग आहोत याबाबतीत देखील खात्री होऊन जाते.
- अॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर