Join us

Jamin Kharedi : खरेदी करावयाच्या मिळकतीबाबत केस सुरु असल्यास... जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:27 IST

Jamin Kharedi : तुम्ही खरेदी करत असेलल्या जमिनीबाबत काही कोर्ट केस चालू असल्यास काय करावे, हेही समजून घ्या..

Jamin Kharedi : खरेदी करावयाच्या (Land Buying Issue) मिळकती संदर्भात कुठे केसेस चालू आहे का किंवा या प्रॉपर्टीमध्ये हक्क हस्तांतर बाबत काही माहिती मिळते का? प्रॉपर्टीला कोणी अपाक आहे का? याबाबतीत देखील आपण माहिती घ्यायला हवी. तसे असल्यास न्यायालयाचे परवानगीने आपत्ती प्रॉपर्टी खरेदी करू शकतो.

प्रॉपर्टी एकत्र कुटुंबाची असल्यास इतर सर्व कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते. त्या बाबतीत देखील आपण तपासणी करायला हवी. तसेच प्रॉपर्टीचे मूल्यांकन त्यानुसार खरेदी (jamin Kharedi) होणे आवश्यक आहे.  प्रॉपर्टी कार्ड (Property Card) असणे हे देखील महत्त्वाचं असतं. प्रॉपर्टी कार्ड  असल्यावर आपला मालकी हक्क स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होतं आणि आपण या जागेचं क्षेत्रफळ निश्चित करू शकतो. अतिक्रमण देखील आपल्याला लक्षात येऊ शकते आणि सरकारी मोजणी नगर भूमापन विभागाकडून केली जाते. सरकारी मोजणी केल्यानंतर मोजनी नकाशा देखील मिळतो. 

हेही वाचा : Jamin Kharedi : जमीन खरेदी करताना एन ए आहे का? झोन कुठला? सोबत 'या' गोष्टीही तपासा

प्रॉपर्टी खरेदी करत असताना त्या प्रॉपर्टीला येण्यासाठी रस्ता आहे का? त्याला तोंडी तारण, जामीनदार म्हणून धारण खाजगी सावकाराकडे आहे का? प्रॉपर्टीमध्ये वारसांचा हक्क आहे काय, तसेच प्रॉपर्टी आरक्षण आहे काय? जसं मोक्याच्या ठिकाणी प्लॉट असतो, परंतु तो खेळाचे मैदान दवाखाना जिम बगीचा शाळा येथे विविध कारणांसाठी आरक्षित असतो. याची माहिती आपल्याला स्थानिक प्रशासनाकडून मिळत असते. 

हेही समजून घ्या.. एकत्र कुटुंब आणि वडिलोपार्जित यामध्ये बऱ्याच वेळेस अडचणी येतात. आपण वडिलोपार्जित म्हणजेच एकत्र कुटुंब मिळकत असं समजतो. परंतु त्या व्यतिरिक्त एकत्र कुटुंब म्हणजे ज्या वेळेस आपण एकत्र कुटुंबात राहत असताना सर्व घरातील सदस्य मिळून आपल्या एकत्रित येणाऱ्या उत्पन्नातून नवीन जमीन खरेदी करतो ती देखील आपला हक्क असणारी सर्वांची जमीन असते. प्रॉपर्टीजवळ नदी असल्यास ते पुररेषा व निर्देशित आहे काय? याबाबतीत तपासणी व्हायला हवी. तसेच रस्त्यालगत असल्यास नियंत्रण दृश्य व बांधकाम रचित आहे काय? त्याबाबत देखील तपासणी करावी.

- अ‍ॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर

टॅग्स :जमीन खरेदीकृषी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरी