Lokmat Agro >स्मार्ट शेती > Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कशी होते फसवणूक? जाणून घ्या सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कशी होते फसवणूक? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Jamin Kharedi fasavnuk Fraud in land purchase and sale transactions | Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कशी होते फसवणूक? जाणून घ्या सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कशी होते फसवणूक? जाणून घ्या सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन खरेदी विक्रीचे (Maharashtra Land Fraud) व्यवहार सातत्याने सुरूच असतात. या व्यवहारातून फसवणुकीच्या घटना समोर येतात.

Jamin Kharedi : जमीन खरेदी विक्रीचे (Maharashtra Land Fraud) व्यवहार सातत्याने सुरूच असतात. या व्यवहारातून फसवणुकीच्या घटना समोर येतात.

शेअर :

Join us
Join usNext

Jamin Kharedi Fasavnuk :जमीन खरेदी विक्रीचे (Maharashtra Land Fraud) व्यवहार सातत्याने सुरूच असतात. परंतु अनेकवेळा या व्यवहारातून फसवणुकीच्या घटना समोर येतात. शिवाय अशी अनेक प्रकरणे  कोर्टात पाहायला मिळतात. त्यामुळे जमीन खरेदी विक्री करताना काळजी घ्यावी लागते. मात्र जमिनीच्या व्यवहारामध्ये नेमकी फसवणूक कशी होते, हे समजून घेऊया.... 


बोगस कागदपत्रे,  बोगस व्यक्ती 
आज जमिनीच्या बाबतीतील अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. परिणामी जमीन खरेदी विक्री दरम्यान कागदपत्रे (Satbara) पाहिली जातात. अशावेळी बोगस कागदपत्रे सादर केली जाण्याची शक्यता असते. शिवाय मध्यस्थी किंवा स्वतः जमीन मालक किंवा खरेदी करणारा देखील बोगस पद्धतीने उभा केला जाऊ शकतो. याद्वारे फसवणूक होऊ शकते. अशावेळी कागदपत्रांची योग्य तपासणी केली पाहिजे, सातबारासह इतर जमिनीची कागदपत्रे, शिवाय आधार, पॅनकार्ड या कागदपत्रांची देखील खात्री केली पाहिजे. 

एकच जमिनीची दोन, तीन जणांना विक्री 
अनेकदा जमीन एकच परंतु याच जमिनीची अनेकदा विक्री होण्याची शक्यता असते. म्हणजेच एकच जमीन दोन, तीन जणांना विकणे होय. साधारण प्रक्रिया काय असते, तर जमीन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला खरेदीखत नोंदणी केली जाते. नंतर सातबारावर नोंदी केल्या जातात. यासाठी सरकारी कामकाजानुसार दोन- तीन महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. या कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुस-या ग्राहकाला रजिस्टर खरेदीखत वापरून पुन्हा जमीन विकू शकतो. 

बँकेत गहाण जमिनीची विक्री 
अनेकदा जमिनीवर कर्ज काढले जाते, म्हणजेच जमीनीचा मूळ मालक आपली जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढतो. या कर्जाची सातबाऱ्यावर नोंद होण्यापूर्वी जर मालकाने जमिनीची विक्री केली तर ग्राहकाची फसवणूक होते. विशेषतः तलाठ्याकडे सातबा-याची नोंद करायला गेल्यानंतर ही फसवणूक लक्षात येते. त्यासाठी त्या गावातील विश्वासू व्यक्तींकडे जमिनीच्या मालकाची चौकशी करावी. हि बाब संशयास्पद वाटली तर बँकेतही चौकशी करावी, म्हणजे तुमची मोठी फसवणूक टळू शकते. 

वारसांची ना हरकत आवश्यक 
जमीन खरेदी विक्री करताना सातबारा अगदी सावधरीतीने तपासून घ्यावा लागतो. जमिनीचा मूळ मालक जिवंत नसेल तर सातबाऱ्यावर वारस म्हणून त्याच्या  मुला-मुलींची नावे असतात. पण जर वारस नोंद झाली नसेल अशा स्थितीत चौकशी न करता थेट जमीन खरेदी केली तर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. कारण  जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीच्या वारसांनी हक्काचा दावा लावला तर हे प्रकरण न्यायालयात जाते, यानंतर अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. 

तक्रार कुठे करावी ? 
अशा प्रकरणात फसवणूक झाली असल्यास व्यक्ती आपल्या अर्जासह जमिनीचे कागदपत्रे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन तक्रार नोंदवू शकतात. या कागदपत्रांच्या आधारे त्याचा पुढीत तपास करता येतो. याशिवाय जर आर्थिक फसवणूक असेल तर त्याची पोलिसात तक्रार करता येते. पोलीस त्याबाबतची पुढील कारवाई करतील. 

Web Title: Latest News Jamin Kharedi fasavnuk Fraud in land purchase and sale transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.