Jamin Kharedi : बांधकामावेळी ग्रामपंचायत सँक्शन आणि टाऊनशिप प्लॅनिंगचे सँक्शन या दोनमध्ये फरक आहेत. शहरी भागात आपल्याला टाऊनशिप प्लॅनिंगची परवानगी ही कंपल्सरी असते. परंतु ज्या वेळेस टाऊनशिप प्लॅनिंग असतं. त्यामध्ये ज्यावेळेस जागा मंजूर होते, त्यावेळेस आपल्याला दिलेल्या जागेतच आणि नियमानुसार सांगितले, तेवढेच बांधकाम करता येते. शहरी हद्दीतील (Land Buying In city) घर याबाबतीत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत....
शहरी हद्दीत ज्यावेळेस आपण बांधकाम परवानगी (Construction Permission) घेतो, त्यावेळेस अनेक अटी व शर्ती असतात. त्यामध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्हीकडे 45 फूट जागा सोडली असावी. दोन्ही बिल्डिंग मध्ये पुरेसे अंतर असावं, वारा खेळता असावा आणि अनेक अटी असतात. कारण शहरी भागात लोकांची संख्या जास्त असते आणि बांधकाम हे नियम व अटीचे नुसार करावे लागते.
आजच्या परिस्थितीत आपण शहरी भागात जर पाहिलं तर निश्चित अनेक बांधकाम हे नियम अटीनुसार नसल्याने भविष्यात जर अतिक्रमण मोहीम निघाली तर अनेक शहरी भागातील बिल्डिंग या पडताना किंवा बिल्डिंग चे मालक हे दंड भरताना दिसून येतील. तसेच बिल्डर यांच्याकडून जमीन घेत असताना आपण या बाबी तपासून जमीन खरेदी करायचे जेणेकरून आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही व केलेलं बांधकाम हे अनाधिकृत ठरणार नाही.
आपण फ्लॅट घेत असताना या बाबी जर पाहिल्या तर जो बिल्डिंग विक्रीसाठी एजंट असतो, तोही निघून जातो आणि त्या बिल्डरने हे काम घेतले असते, तोही निघून जातो आणि आपण मात्र तेथे रहिवास करत असल्याने जो काही दंड किंवा जी काही नियम लागू होणार असतात, ते सर्वस्वी आपल्यावर लागू होतात. त्यामुळे खरेदी करत असतानाच आपण वरील बाबींचा तपास करूनच खरेदी करावे, जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाही.