Lokmat Agro >स्मार्ट शेती > Jamin Kharedi : जमीन खरेदीपूर्वी रस्त्याला लागून आहे का? असं का विचारलं जात? वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन खरेदीपूर्वी रस्त्याला लागून आहे का? असं का विचारलं जात? वाचा सविस्तर 

Latest News Jamin Kharedi road necessary when buying land Read in detail | Jamin Kharedi : जमीन खरेदीपूर्वी रस्त्याला लागून आहे का? असं का विचारलं जात? वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन खरेदीपूर्वी रस्त्याला लागून आहे का? असं का विचारलं जात? वाचा सविस्तर 

Jamin Kharedi : आजच्या भागातून जमीन खरेदी (Jamin Kharedi) करतांना आजूबाजूला रस्ता असणे किती आवश्यक असते, ते समजून घेऊया...

Jamin Kharedi : आजच्या भागातून जमीन खरेदी (Jamin Kharedi) करतांना आजूबाजूला रस्ता असणे किती आवश्यक असते, ते समजून घेऊया...

शेअर :

Join us
Join usNext

Jamin Kharedi : शेती असो वा घर प्रत्येकाला आवश्यक असतो तो रस्ता.. रस्ता म्हणजे विकास आणि समृद्धी. परंतु रस्ता नसल्याने अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते तर कधी कधी शेतकऱ्यांचे शेत सुद्धा पडीक पडते. म्हणूनच आजच्या भागातून जमीन खरेदी (Jamin Kharedi) करतांना आजूबाजूला रस्ता असणे किती आवश्यक असते, ते समजून घेऊया...

गेल्या काही वर्षांपासून रस्त्याला लागून असलेल्या जमिनी खरेदी (Land Buying) करण्यावर मोठा भर दिला जात आहे. जमीन खरेदीपूर्वी जमीन रस्त्याला लागून आहे का? अशी विचारणा होते. अलीकडच्या वर्षांत शेत रस्ते, पाणंद रस्ते, शिवार रस्ते (Shiwar Raste) ही प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. 

दरम्यान जमीन खरेदी करतांना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, त्यापैकीच एक म्हणजे रस्ता. त्यामुळे सावधगिरीने चतूर्सिमा पाहूनच जमिनीची खरेदी व्हावी आणि त्यावेळी पूर्व, पश्चिम, दक्षिण किंवा उत्तर एक तरी दिशेला रस्ता नमूद असावा आणि नमूद असलेला रस्ता अधिकृत असावा, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. 

अनेकदा शेतकरी वर्गाला क्षेत्र एक आणि दाखवले जाते, मात्र वेगळे, कच्चा रस्ता हाच कायमचा रस्ता आहे, असे सांगून खरेदी करून दिली जाते. बऱ्याच वेळेस खरेदी वेळी जागा पाहिली जाते. परंतु त्या जागेत जाण्यासाठी अधिकृत रस्ता आहे की नाही, हे मात्र रेकॉर्डला तपासले जात नाही. 

चतूर्सिमा नावाचा प्रमुख प्रकार यावेळी दुर्लक्षित होतो आणि चतूर्सिमा म्हणजे आपल्या जागेच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कोण आहेत, त्यांची नावे. आणि याच चतूर्सिमाकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते, यातून फसवणूक होण्याचा धोका असतो. मग खरेदीनंतर रस्त्यासाठी भांडत बसावे लागते.


- अ‍ॅडव्होकेट मयूर कारभारी वाखुरे, जिल्हा व सत्र न्यायालय, नेवासा, अहिल्यानगर

Web Title: Latest News Jamin Kharedi road necessary when buying land Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.