Join us

Bagayati Kapus : बागायती कपाशीसाठी ठिबक सिंचन पद्धत सर्वात बेस्ट पर्याय, कारण.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:00 IST

Bagayati Kapus : उन्हाळी बागायती कापसाची लागवड (Cotton cultivation) ही उन्हाळी हंगामात उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून असते.

Bagayati Kapus : राज्यात बागायती उन्हाळी कापसाची लागवड (Unhali Kapus Lagvad) एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केली जाते. अलीकडे बीटी कापसापासून भरघोस उत्पादन मिळत असल्यामुळे आणि कापसालाही समाधानकारक बाजार भाव मिळत असल्यामुळे कापूस लागवड क्षेत्रातही दरवर्षी वाढ होत आहे.

उन्हाळी बागायती कापसाची लागवड (Cotton cultivation) ही उन्हाळी हंगामात उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून असते आणि ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यांनी उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. ठिबक सिंचन संचाचा सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त असल्याने ही पद्धत आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी कापसाच्या प्रचलित लागवड पद्धतीत बदल करून जोड ओळ पद्धतीत कापसाची लागवड करावी. 

  • मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेले प्रचलित पद्धतीतील दोन ओळीतील ९० सेंटीमीटर अंतर कमी करून ६० सेंटिमीटर एवढे ठेवावे. 
  • असे केल्याने दोन जोड ओळीत १२० सेंटिमीटर एवढे अंतर राखले जाते. 
  • प्रत्येक जोड ओळीसाठी एक उपनळी व उपनळीवर दोन झाडांसाठी ९० सेंटीमीटर अंतरावर एक तोटी वापरावी. 
  • अशा प्रकारे उपनळ्यात १८० सेंटीमीटर  म्हणजे ६ फूट अंतर राखले जाते. 
  • भारी काळया जमिनीत कापसासाठी प्रचलित पद्धतीत शिफारस केलेले १२० सेंटिमीटर अंतर कमी करून ९० सेंटीमीटर ठेवावे. 
  • अशा पद्धतीत दोन जोड ओळीत १५० सेंटीमीटर  व दोन उपनळ्यात २४० सेंटीमीटर म्हणजे ८ फूट अंतर राखले जाते. 
  • जोड ओळीतील ९० सेंटीमीटर अंतरावरील समोरासमोरील दोन झाडांकरता एका तोटीचा वापर करावा.
  • ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना इनलाईन प्रकारची उपनळीचा वापर करायला हरकत नाही. 
  • त्यामुळे जोड ओळीतील संपूर्ण पट्टा योग्य प्रकारे ओला होतो.

 

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ 

टॅग्स :कापूसशेतीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेतकरी