Crop Water Management : खरीप पिके (Kharif crop) ही मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र काही वेळा अधिकचे पाणीही पिकांना नुकसानकारक ठरते. तर कधी पावसाने उघडीप दिली तर पिकांना पाणी देणे गरजेचे ठरते. त्यानुसार खरीप पिकांना पाणी देण्याची योग्य वेळ कोणती? ते शेतकऱ्यांनी समजून घेतल पाहिजे. विशेषत मध्यम आणि खोल काळ्या जमिनीसाठी खालील शिफारशी लागू पडतात.
खरीप ज्वारीसाठी....
- खरीप ज्वारी पिकासाठी ४०-45 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
- या पिकाला चार वेळा पाणी पाळ्या करावा लागतात.
- या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणी पासूनचा काळ जर धरला तर गर्भावस्था २५-30 दिवस, पोटरी अवस्था ५०-५५ दिवस, फुलोरा अवस्था ७० ते ७५ दिवस, तर दाणे भरण्याचा काळ हा ९० ते ९५ दिवसांचा असतो.
बाजरी पिकासाठी....
- बाजरी पिकासाठी २५-३० सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
- या पिकाला २ वेळा पाणी पाळ्या करावा लागतात.
- या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणी पासूनचा काळ जर धरला तर फुटवे फुटणे २५ ते ३० दिवस, फुलोरा अवस्था ५०-५५ दिवसांचा असतो.
मका पिकासाठी....
- या पिकासाठी ४०-४२ सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
- या पिकाला ४ वेळा पाणी पाळ्या करावा लागतात.
- या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणी पासूनचा काळ जर धरला तर रोपावस्था २५ ते ३० दिवस, तुरा बाहेर पडतानाची अवस्था ४५ ते ५० दिवस, फुलोरा अवस्था ६० ते ६५ दिवस, दाणे भरण्याचा काळ ७५ ते ८० दिवसांचा असतो.
भुईमूग पिकासाठी.....
- भईमूग पिकासाठी 40-45 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
- या पिकाला 3 वेळा पाणी पाळ्या करावा लागतात.
- या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणी पासूनचा काळ जर धरला तर फांद्या फुटणे 25 ते 30 दिवस, आऱ्या उतरणे अवस्था 40-45 दिवस, शेंगा भरण्याची अवस्था 65-70 दिवसांचा असते.
सूर्यफूल पिकासाठी..
- सूर्यफूल पिकासाठी ३०-३५ सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
- या पिकाला ४ वेळा पाणी पाळ्या करावा लागतात.
- या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणी पासूनचा काळ जर धरला तर रोपावस्था १५-२० दिवस, फुलकळ्या लागण्याची अवस्था ३०-३५ दिवस, फुलोरा अवस्था ४५-५० दिवस, दाणे भरण्याचा काळ ६०-६५ दिवसांचा असतो.
तूर पिकासाठी....
- तूर पिकासाठी ४०-४५ सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
- या पिकाला 4 वेळा पाणी पाळ्या करावा लागतात.
- या पिकाची संवेदनक्षम अवस्था पेरणी पासूनचा काळ जर धरला तर फांद्या फुटणे ३०-३५ दिवस, फुलोरा अवस्था ६०-६५ दिवस, शेंगा भरणे अवस्था ९०-९५ दिवस, खोडवा - पुन्हा फुले येताना २० दिवस, शेंगा भरणे त्यानंतर २० दिवसांचा काळ असतो.
मूग/उडीद पिकासाठी
- मूग/उडीद पिकासाठी २०-२५ सेंटीमीटर पाण्याची गरज असते. आवश्यतेनुसार पेरणीनंतर २५ दिवसांनी, त्यानंतर २०-२५ दिवसांनी...
कापूस पिकासाठी
- कापूस पिकासाठी ४५ -५० सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते.
- उगवण, फांद्या फुटणे, पाते लागणे, फुले लागणे, बोंडे धरणे, बोंडे भरणे या संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे.
संकलन : डॉ. कल्याण देवळाणकर सेवानिवृत्त शास्रज्ञ कृषी विद्यापीठ