Lokmat Agro >स्मार्ट शेती > Low Cost Business Idea : सबसिडीतून 'हे' दोन व्यवसाय सुरु करा अन् चांगलं उत्पन्न मिळवा, वाचा सविस्तर 

Low Cost Business Idea : सबसिडीतून 'हे' दोन व्यवसाय सुरु करा अन् चांगलं उत्पन्न मिळवा, वाचा सविस्तर 

Latest News Low Cost Business Idea Start these two businesses with subsidy and earn good income, read in detail  | Low Cost Business Idea : सबसिडीतून 'हे' दोन व्यवसाय सुरु करा अन् चांगलं उत्पन्न मिळवा, वाचा सविस्तर 

Low Cost Business Idea : सबसिडीतून 'हे' दोन व्यवसाय सुरु करा अन् चांगलं उत्पन्न मिळवा, वाचा सविस्तर 

Low Cost Business Idea : जर तुम्ही खूप दिवसांपासून तुमचा स्वतःचा एक चांगला व्यवसाय (Small Business) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Low Cost Business Idea : जर तुम्ही खूप दिवसांपासून तुमचा स्वतःचा एक चांगला व्यवसाय (Small Business) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Low Cost Business Idea :  कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू (Low Cost Business Idea) करण्यासाठी शासनाकडून  योजनांच्या माध्यमातून कर्ज आणि सबसिडीच्या सुविधा दिल्या जात आहेत. यातीलच एक म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana). या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना ही सुविधा मिळत आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून तुमचा स्वतःचा एक चांगला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

या लेखाद्वारे अशा 2 छोट्या व्यवसायाच्या (small Business) कल्पना आणल्या आहेत, ज्या सुरू करण्यासाठी या योजनेंतर्गत आर्थिक मदत देखील दिली जाते. ज्यासाठी तुम्हाला सरकारच्या मुद्रा योजनेमध्ये अर्ज करावा लागेल. या योजनेमुळे सरकार छोट्या व्यावसायिकांना ७५ ते ८० टक्के कर्ज देते. या कर्जावरील व्याजदर इतर कर्जाच्या तुलनेत 1 ते 2 टक्के स्वस्त आहे. चला जाणून घेऊया या व्यवसायांबद्दल सविस्तर…

पापड निर्मितीचा व्यवसाय
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत तुम्ही पापड बनवण्याचा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करू शकता. यामध्ये तुमची सुरुवातीची गुंतवणूक काही रुपयांपर्यंत असू शकते, ज्यामध्ये सरकार पापड युनिट उघडण्यासाठी कर्ज देते. याशिवाय तुम्हाला उद्योजक सपोर्ट स्कीम अंतर्गत सरकारकडून सबसिडी देखील मिळेल.

करी आणि तांदूळ पावडरचा व्यवसाय
देशात करी आणि तांदूळ पावडरची मागणी काळानुरूप सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत करी पावडरचा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर सौदा ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला प्रथम काही रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. यावर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत बँकेकडून मुदत कर्ज आणि खेळते भांडवल कर्ज देखील घेऊ शकता. हा व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज भासणार नाही.

अधिक माहितीसाठी https://www.mudra.org.in/ या संकेस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकता. 

Web Title: Latest News Low Cost Business Idea Start these two businesses with subsidy and earn good income, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.