Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप (Magel Tyala Solar Pump) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेमेंट भरणा करण्यासाठी मेसेज येत आहेत. काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच पैसे भरलेले आहेत आणि ते पुढील प्रोसेसनुसार पात्र सुद्धा झालेले आहेत. पैसे भरल्यानंतर तुमचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सबमिट होणार आहे.
जर तुमचे पेमेंट भरणे बाकी असल्यास पेमेंट (Solar Pump Payment) करण्यासंदर्भात मेसेज आला येईल. मॅसेज आला असल्यास आपण तात्काळ योजनेच्या नियमानुसार मागणी पत्राची रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपला अर्ज पूर्णपणे सादर होईल.
अर्जाची सद्यस्थिती, पेमेंट झालं की नाही हे कसे समजेल?
सर्वप्रथम https://www.mahadiscom.in/ या संकेतस्थळावर जायचे आहे.
या ठिकाणी कोपऱ्यात असलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर लाभार्थी सुविधा यावर क्लिक करा. यातील अर्जाची सद्यस्थिती यावर जा.
येथील Search by Beneficiary ID या पर्यायासमोरील रकान्यात आपला प्राथमिक नोंदणी क्रमांक टाका.
यानंतर Search बटनावर क्लिक करा.
पुढील विंडोमध्ये आपली सगळी माहिती दिसेल. शिवाय अर्ज Draft मध्ये आहे की सबमिट झाला आहे, हेही लक्षात येईल.
ड्राफ्टमध्ये असल्यास पेमेंट बाकी असल्याचे दिसेल. त्यानुसार खाली दिलेल्या Proceed Payment बटणावर क्लिक करा.
यानंतर आपला अर्ज पूर्ण झाल्याचे दिसेल.
अशा पद्धतीने शेतकरी बांधवानी सोलर योजनेचा पेमेंट करण्यासंदर्भात मॅसेज आला असल्यास ही प्रक्रिया प्राधान्याने करावी.