Join us

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेचे पेमेंट कसे कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 5:32 PM

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेचे पेमेंट कसे करायचे, याबाबत समजून घेऊया.... (Solar Pump Payment)

Magel Tyala Solar Pump : ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala solar Pump Yojana) राबविण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भारवी लागेल. या योजनेचे पेमेंट कसे करायचे, याबाबत समजून घेऊया.... 

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

  • सर्वप्रथम mahadiscom या संकेतस्थळावर जा. 
  • यानंतर लाभार्थी सुविधा हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. अर्ज करा, अर्जाची सद्यस्थिती आणि देयक भरणा करा असे तीन पर्याय दिसतील. 
  • यातील देयक भरणा करा या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी क्रमांक विचारला जाईल, तो टाकायचा आहे. जो फॉर्म भरताना नंबर भेटला होता. याला एम के आयडी असंही म्हणतात. 
  • लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जिल्हा, लाभार्थ्याचे नाव, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, अर्जाचा दिनांक ही माहिती स्क्रिनवर दिसेल. 
  • यानंतर सर्व अटी वाचून झाल्यावर इथे रक्कम भरणा करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. 
  • रक्कम भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, यूपीआय आदी पर्याय आहेत, त्यानुसार पेमेंट करायचे आहे. 
  • यानंतर आपल्याला पेमेन्ट झाल्याचे स्क्रिनवर दिसेल. 

महत्वाचे... 

या योजनेच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ एचपी, ५ एचपी, ७ एचपी असे पर्याय आहेत. आणि त्यानुसार शेतकऱ्यांना भरणा करावयाचा आहे. ५ एचपीसाठी रक्कम पाहिली तर 32 हजार 75 रुपये राहणार आहे आणि ०३ एचपी साठी 22 हजार 971 रुपये भरावे लागणार आहे. तसेच पेमेंट करताना तुम्ही जर क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात. डेबिट कार्ड, यूपीआय यांना पेमेंट चार्जेस लागणार नाही. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजना