Lokmat Agro >स्मार्ट शेती > Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला का? इथं वाचा सविस्तर 

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला का? इथं वाचा सविस्तर 

Latest News Magel Tyala solar pump yojana quota of solar pump scheme been fulfilled or not Read in detail here | Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला का? इथं वाचा सविस्तर 

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला का? इथं वाचा सविस्तर 

Magel Tyala Solar Pump : शेतकरी संभ्रावस्थेत असून सोलरचा कोटा (Solar Pump Quota) पूर्ण झाला का? झाला असेल तर पुढे काय? याबाबत माहिती घेऊयात... 

Magel Tyala Solar Pump : शेतकरी संभ्रावस्थेत असून सोलरचा कोटा (Solar Pump Quota) पूर्ण झाला का? झाला असेल तर पुढे काय? याबाबत माहिती घेऊयात... 

शेअर :

Join us
Join usNext

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या (Magel Tyala solar Pump Yojana) माध्यमातून अनेक शेतकऱ्यांकडे सोलर पंप (Solar Pump) आस्थापित होत  शेतकरी अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, काहींच्या मते सोलरचा कोटा पूर्ण झाला आहे. आता आपल्याला पंप मिळणार का? असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रावस्थेत असून आजच्या लेखातून सोलरचा कोटा पूर्ण झाला का? झाला असेल तर पुढे काय? याबाबत माहिती घेऊयात... 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Saur Krushi Pump Yojana) राबवली जात आहे. ज्याच्या अंतर्गत साडेदहा लाख पंप हे शेतकऱ्यांना आस्थापित करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे. ल्या साधारण मार्च 2027 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवस बारा तास वीज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. महावितरणच्या माध्यमातून मार्च 2025 पर्यंत दीड लाख सोलर पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले होते. 

जवळजवळ अडीच लाख सोलर पंपाचा कोटा कुसुम योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या अंतर्गत पूर्वीचे काही पंप आणि आता नवीन एक लाख 80 हजार पंप असा तो कोटा देण्यात आलेला होता. एकंदरीत राज्य शासनाला किंवा महावितरणला मोठा कोटा देण्यात आला आहे. त्याचे सेंट्रलाइज टेंडर निघतात, त्या अंतर्गत कंपन्या उपलब्ध होतात. जरी मार्चपर्यंत जरी उद्दिष्ट पूर्ण झालेला असले तरी याच्या अंतर्गत जे काही उद्दिष्ट घेण्यात आलेले की उद्दिष्ट साडेदहा लाख पंपाचे आहे. 

साडे दहा लाख पंपाचे उद्दिष्ट 

मागेल त्याला सोलर या योजनेच्या अंतर्गत कोटा हा संपलेला नाही. एका टप्प्याची प्रक्रिया पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याची सुरवात होत असते. यापूर्वी अटल सौर असेल यात अनेक शेतकरी पात्र झाले होते, त्यामध्ये टप्पा एक होता, टप्पा दोन आला. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आली, टप्पा पहिला, पहिल्या टप्प्यामध्ये 25 हजार पंप, दुसऱ्या टप्पा आणि तिसरा टप्पा एकत्रितपणे 75 हजार पंप आस्थापित करण्यात आले. त्यानंतर कुसुम योजना आली, या योजनेत फक्त 2750 पंपापासून सुरू झाली आणि हळूहळू त्या अंतर्गत टप्पे वाढत जाऊन आता साडे दहा लाख पंपाचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. 

शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही

त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. ज्यांनी या योजेनेनंतर्गत अर्ज केलेले आहेत. जे शेतकरी पात्र होतील, त्या पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.  मात्र टप्पा एकमधून टप्पा दोनमध्ये, टप्पा दोनमधून टप्पा तीनमध्ये जाण्यासाठी जो कालावधी असतो, त्या प्रक्रियेला वेळ जाण्याची शक्यता आहे. साधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर यामध्ये कंपन्या समाविष्ट होतील, अशी शक्यता आहे. ज्या पद्धतीने सध्या योजनेची अंमलबजावणी होते, त्यानुसार लवकर कंपन्या समाविष्ट होण्याची शक्यता असून शेतकऱ्याला पुढील लाभ जे आहेत, दिले जाऊ शकतात. 

Web Title: Latest News Magel Tyala solar pump yojana quota of solar pump scheme been fulfilled or not Read in detail here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.