Lokmat Agro >स्मार्ट शेती > Maize Crop Management : मका पिकाला पाण्याच्या पाळ्या कशा व किती द्याव्या? जाणून घ्या सविस्तर 

Maize Crop Management : मका पिकाला पाण्याच्या पाळ्या कशा व किती द्याव्या? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Maize Crop Management How and how much water should be given to Maka crop Know in detail  | Maize Crop Management : मका पिकाला पाण्याच्या पाळ्या कशा व किती द्याव्या? जाणून घ्या सविस्तर 

Maize Crop Management : मका पिकाला पाण्याच्या पाळ्या कशा व किती द्याव्या? जाणून घ्या सविस्तर 

Maize Crop Management : मका पिकाची रोपावस्था जास्त पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून...

Maize Crop Management : मका पिकाची रोपावस्था जास्त पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून...

शेअर :

Join us
Join usNext

Maize Crop Management : मका हे रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्वाचे पीक आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील मका पिकाची लागवडीसह इतर कामे सुरु आहेत. या पिकाच्या पाणी व्यवस्थापन (Maize Crop Management) करताना काळजी घेणे महत्वाचे असते. मका पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे, हे जाणून घेऊयात... 

मका पाणी व्यवस्थापन 

  • मका पिकाची रोपावस्था जास्त पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सूरवातीच्या २० दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे.
  • मका पिक पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहे. त्यामुळे खरिप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्वाच्या अवस्थांच्या काळात संरक्षित पाणी द्यावे.
  • पाण्याची एकूण गरज ४० ४५ (सें. मी.) असून पाण्याच्या एकूण ४ पाळ्या लागतात.
  • रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १०-१२ दिवसाच्या अंतराने, तर उन्हाळी हंगामात ८-१० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
  • मका पिकास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ होते. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात जिरायती मका पिक येते.

 

पाण्यासाठी संवेदनशील अवस्था

१. रोप अवस्था : २५-३० दिवसांनी

२. तुरा बाहेर पडताना : ४५-५० दिवसांनी

३. फुलोऱ्यात असताना : ६० - ६५ दिवसांनी

४. दाणे भरणेचेवेळी : ७५-८० दिवसांनी

- कृषी विभाग, महाराष्ट्र शासन 

Web Title: Latest News Maize Crop Management How and how much water should be given to Maka crop Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.