Lokmat Agro >स्मार्ट शेती > Maka Crop Management : रब्बी मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Maka Crop Management : रब्बी मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Latest News Maka Crop Management Do this to control armyworm on Rabi maize, read in detail | Maka Crop Management : रब्बी मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Maka Crop Management : रब्बी मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Maka Crop Management : रब्बी मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण (Maka Crop Management) पद्धतीचा वापर करावा.

Maka Crop Management : रब्बी मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण (Maka Crop Management) पद्धतीचा वापर करावा.

शेअर :

Join us
Join usNext

Maka Crop Management : रब्बी मक्यावरील लष्करी अळीला अमेरिकन लष्करी अळी (Lashkari Ali) असेही म्हणतात. या अळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या अळीचा प्रादुर्भाव मका, ज्वारी, भात या पिकांवर दिसून येतो. रब्बी मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण (Maka Crop Management) पद्धतीचा वापर कसा करावा, जाणून घेऊयात या लेखातून... 

रब्बी मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रण :

भौतिक नियंत्रण - 

  • शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.
  • किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. 
  • असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही.

 

जैविक नियंत्रण -

अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी ५० हजार अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत.

प्रतिबंधात्मक उपाय - 

पिकाचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.

रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  • रब्बी मका वरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अळीच्या वाढीच्या लवकरच्या (१ ते ३ अवस्था) अवस्थांमध्ये निम अर्क १५०० पीपीएम ५ मिली किंवा निंबोळी अर्क ५ टक्के यांची प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • अथवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस जी. या कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • अथवा प्रभावी नियंत्रणासाठी ५ मिली स्पिनेटोरम ११.७ टक्के एस.सी. प्रति १० लिटर पाण्यातून प्रादुर्भाव दिसून येताच १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Maka Crop Management Do this to control armyworm on Rabi maize, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.