Maka Van : शेतकरी कोणत्याही पिकातून चांगले उत्पन्न मिळवू शकतो, जोपर्यंत त्याचे बंपर उत्पादन मिळत असते. जर शेतकऱ्याला सुधारित वाणांचे बियाणे उपलब्ध (Seed) झाल्यास देखील भरगोष उत्पादन मिळू शकते. भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IIMR) मक्याच्या (Maize Seed) DMRH 1308 आणि DMRH 1301 या दोन जाती विकसित केल्या आहेत, ज्यांच्या लागवडीतून बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काळात, मक्याच्या 25 सिंगल क्रॉस हायब्रीड विकसित केल्या आहेत. सीव्हीआरसी (Central Variety Release Committee) द्वारे IIMR कडून माध्यमातुन रिलीज करण्यात आल्या आहेत. यात DMRH 1308 आणि DMRH 1301 अशी त्यांची नावे आहेत. हे 2018 मध्ये जारी करण्यात आले आणि अधिसूचित केले गेले, ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर मक्याची उत्पादकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारतीय मका संशोधन संस्थेने मक्याच्या दोन सुधारित जाती विकसित केल्या आहेत. यात एक DMRH 1308 आणि दुसरी DMRH 1301 अशा दोन जाती विकसित केल्या आहेत. या दोन्हीही जाती उच्च उत्पादन क्षमता आणि रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्या आहेत. यातील DMRH 1308 चे उत्पादन 7-10.5 टन/हेक्टर आणि DMRH 1301 रब्बी हंगामात 6.5-10.5 टन/हेक्टर उत्पादन देते. हे वाण शेतकऱ्यांना सुधारित उत्पादन आणि नफा देण्यास मदत करतात.
मक्याची DMRH 1308 वाण
बिहार, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रब्बी हंगामात लागवडीसाठी संकरित DMRH 1308 ची शिफारस करण्यात आली आहे. हा एक उच्च उत्पन्न देणारा संकरित मका आहे, जो रब्बी हंगामात 130 ते 150 दिवसांत परिपक्व होतो, आकर्षक पिवळा दाण्यांचा रंग, रोगांना प्रतिबंध करणारा आहे. ही संकरित प्रजाती शेतकऱ्यांच्या शेतात 7.0 ते 10.5 टन/हेक्टरी उत्पादन देत आहे, म्हणजेच उत्पादन प्रति हेक्टरी 100 क्विंटलपेक्षा जास्त आहे.
मक्याचा DMRH 1301 वाण
DMRH 1301 ची 2018 मध्ये पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली होती. हा आणखी एक मध्यम कालावधीचा संकरित मका आहे. आकर्षक पिवळ्या दाण्यांचा रंग, उत्तम रोग प्रतिकारकशक्ती असलेली ही उच्च उत्पन्न देणारी जात आहे. या संकराने शेतकऱ्यांच्या शेतातही चांगली कामगिरी केली असून त्याचे उत्पादन 6.5 ते 10.5 टन/हेक्टरी आहे, म्हणजेच चांगली मेहनत घेतल्यास या जातीपासून प्रति हेक्टरी 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते.
Gajar Lagwad : अधिक उत्पादन देणाऱ्या व लवकर काढणीला तयार होणाऱ्या गाजराच्या जाती