Lokmat Agro >स्मार्ट शेती > Citrus Fruits Management : लिंबूवर्गीय फळपिकांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन

Citrus Fruits Management : लिंबूवर्गीय फळपिकांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन

Latest News Management of fungal and insect infestations on citrus fruit crops | Citrus Fruits Management : लिंबूवर्गीय फळपिकांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन

Citrus Fruits Management : लिंबूवर्गीय फळपिकांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन

Citrus Fruits Management : संत्रा / मोसंबी फळपिकांच्या आंबिया बहाराच्या फळांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Citrus Fruits Management : संत्रा / मोसंबी फळपिकांच्या आंबिया बहाराच्या फळांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Citrus Fruits Management : संत्रा / मोसंबी फळपिकांच्या आंबिया बहाराच्या फळांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फळगळ तसेच फळांच्या गुणवत्तेवर परिणाम दिसून येतो. त्या करिता रोग व किडींचे व्यवस्थापनेसाठी परिणाम कारक उपाययोजना करणे गरजेचे ठरते. 

फळमाशी :

१) प्रौढ मादी फळाच्या सालीखाली एक वा अनेक अंडी घालते. 

२) तीन ते पाच दिवसांत अंडी उबून मळकट पांढऱ्या रंगाच्या लहान पाय नसलेल्या अळ्या बाहेर पडतात. 

३) या अळ्या फळामध्ये शिरून त्यातील रस, गर खाऊन टाकतात. त्यामुळे फळाचा नाश होतो.                     

४) अंडी घालताना जिथे छिद्रे पडले असतात, तो भाग इतर रोगजंतुनी संक्रमित होऊन तिथे पिवळे डाग पडतात आणि अकाली फळगळ होते. 

५) फळ दाबले असता फळातून छिद्रे असलेल्या जागेतून पिचकारी सारखे फवारे उडतात.

फळातील रस शोषण करणारा पतंग 

१) या किडीमुळे सर्वाधिक फळगळ सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात दिसून येते. 

२) या किडीचा पतंग सायंकाळी सक्रिय होऊन पक्क होत असलेल्या फळाला सुई सारख्या सोंडे द्वारे छिद्र करून रस शोषून घेतो. 

३) छिद्र पडलेल्या जागेतून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळ सडण्यास सुरुवात होते, परिणामी फळ गळून पडतात. 

४) अशा फळांना दाबले असता छिद्रातून आंबलेल्या रस बाहेर येतो. गळलेले फळ पूर्णतः सडते, त्याला दुर्गंध येते व त्यावर अनेक छोट्या माश्या घोंगावू लागतात.

 

कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे 

१) कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिग तयार होऊन तो भाग काळा पडतो. भाग नंतर वाढत जातो आणि संपर्ण फळ सडते. 

२) कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. 

३) बरेचदा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, वजनाने हलके होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.

ग्रेसी स्पॉट

१) सर्वप्रथम पानांवर पिवळसर ते गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात. 

२) पानाखाली असलेले चट्टे अधिक गडद होऊन संमातर वरीत पृष्ठभागावर सुद्धा विकसित होतात. 

३) अनियमित आकाराचे पिवळे वलय असलेले तेलकट चट्टे पानाखाली व पानांच्या वरच्या बाजूने निर्माण होऊन दुरून झाडे पिवळी पडल्याचे भासते.  

३) विकसित होत असलेल्या फळाना संसर्ग झाल्यास फळांच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाचे, तहान आकाराचे डाग तयार होतात. 

४) फळांवर, मृत पेशीयुक्त तेलकट चट्टे दिसून पडतात.

ब्राऊन रॉट (फळावरिल तपकिरी कूज) 

१) फळाच्या हिरव्या कातडीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगा मध्ये परावर्तीत होते. फळे सडून गळतात. 

२) या फळ सडीच्या अवस्थेस 'ब्राऊन रॉट' किवां तपकिरी रॉट' असे संबोधतात. 

३) फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. 

४) करड्या रंगाची फळे यांची तोड केल्यानंतर ते निरोगी फळात मिसळल्यास निरोगी फळे पण सडतात.

व्यवस्थापन : 

फळमाशी 

१) फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे (मिथिल यूजोनौल) प्रती हेक्टरी २५ या प्रमाणात तोडणीच्या साधारण २ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत. 

२) बागेतील खाली पडलेली फळे वेचून नष्ट करून बाग स्वछ ठेवावी. 

३) फळमाशीची कोषावस्था जमिनीत २ ते ३ सेंटीमीटर खोलीपर्यंत असते. 

४) झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी.

 

फळातील रस शोषण करणारा पतंग 

१) संत्रा रस शोषक पतंग किडीसाठी संत्रा पिकाच्या व्यतिरिक्त असलेल्या यजमान तणाचा नाश करावा. उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ. यजमान तणावर या किडीची अळी अवस्था राहते. 

२) साधारणतः सायंकाळच्या वेळी (७ ते रात्री ११) या कालावधीमध्ये बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा. 

३) फळ पक्कतेच्या वेळी बागेच्या चार हि कोपऱ्यामध्ये तसेच मध्यभागी एक मर्क्युरी प्रकाशाचे दिवे लावावेत आणि दिव्यांच्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसीन ओतून ठेवावे. 

४) रसशोषण करणाऱ्या पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करुन बागेत ठेवावी. या करीता मॅलॅथिऑन ५० ईसी २० मिली २०० ग्रॅम गुळ खाली पडलेल्या फळांचा रस (४०० ते ५०० मिलि) २ लिटर पाण्यात मिसळून प्रत्येकी दोन आमिषे रुंद तोंडाच्या दोन बाटल्यात टाकून प्रत्येक २५ ते ३० झाडांमध्ये एक या प्रमाणात ठेवावे.                                                                                                                ५) फळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रुपांतर होत असताना १०-१५ दिवसाच्या अंतराने फळ तोडणी होईपर्यंत निंबोळी तेल किंवा मिनरल ओईल १० मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

६) बागेतील खाली पडलेली फळे वेचून खड्यात पुरून बाग स्वछ ठेवावी.

 

कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे 

कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉटमुळे होणाऱ्या फळगळसाठी बोर्डेक्स ०.६ टक्के मिश्रणाची किवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम प्रति लिटर किवा अझोक्सस्ट्रोबिन डायफेनकोणाझोत १ मिति प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

 

ग्रेसी स्पॉट 

१) खाली पडलेल्या पानांचा खच यांचे विघटन जलद गतीने होण्याकरिता कडीकचरा विघटन करणाऱ्या ईतर उपयोगी बुरशींचा (शेणखता सह मिश्रित बायो- डिकंपोझर (१ किलो/ झाड) वापर करावा. 

२) साधारणतः झायनेब' (२० ग्रॅम/१० लि. पाणी) किवा होर्टीकल्‌चरल मिनरल ऑइल २% (२०० मिलि १० लिटर पाणी) किवा पूर्व मिश्रित बुरशीनाशक हेक्साकोनाझोल ४% झापनेव ६८% डब्लुपी १५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.                                                                     

३) मिनरल ऑइल किवा बुरशीनाशकांचा वापर केल्याने पानामध्ये बीजाणूंचा प्रवेश कमी होतो, तसेच बीजाणूंची उगवण कमी होते. 

४) बुरशींचा संसर्ग झाला असल्यास लक्षणांच्या विकासास प्रतिबंध किंवा विलंब होतो. त्याचबरोबर तेलकट चट्टे यांची तीव्रता कमी दिसून येते. 

 

ब्राऊन रॉट (फळावरील तपकिरी कूज) 

१) सर्वप्रथम झाडांवर गळून पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहू देऊ नये. अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. 

२) वाफा स्वच्छ ठेवावा. फळबागेत फळाचे ढीग कुठेही ठेवू नका, कारण ते रोगाचे प्रसार करण्याचे कार्य करतात. 

३) फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ व फळावरील तपकिरी कुज वा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर ४) फासिटील ए.एल. २.५ ग्रॅम किवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० डब्लूपी ३ ग्रॅम प्रती लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. 

५) फवारणी करताना झाडाच्या परिघातामध्ये सुद्धा फवारणी करावी. जेणेकरून खाली पडलेली फळे उचललेली नसल्यास त्यावरील बुरशीचा नायनाट होईल. 

६) तसेच जमिनीमधील सक्रीय बीजाणूचा नायनाट होण्यासाठी मदत होईल. 

७) चांगले परिणाम मिळण्यासाठी या औषधामध्ये इतर कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते मिसळू नये. 

८) फायटोप्थोरा बुरशीचा मुळांवर प्रादुर्भाव असल्यास सायमोक्सनील ८%, मकोजेब ६४%, डब्लूपी' (मिश्र घटक असलेले) बुरशीनाशक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणात जवस तेल २.५ मिली मिसळून असे द्रावण वाफ्यात मिसळावे. 

१०) किंवा मेटलवशील एम ३३% क्लोरोधायलोनीत ३३.१% एससी' (मिश्र घटक असलेते बुरशीनाशक २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण वाफ्यात टाकावे. 

 

 स्रोत : अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पं. दे. कृ. वि.  अकोला 

Web Title: Latest News Management of fungal and insect infestations on citrus fruit crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.