Join us

New Grape Variety : नादच खुळा! पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातच तयार केलं नवं 'द्राक्ष वाण'

By दत्ता लवांडे | Updated: February 3, 2025 19:08 IST

New Grape Variety : पांढऱ्या रंगाच्या द्राक्षापासून लाल रंगाचे द्राक्ष (Red Grape) तयार करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे.

New Grape Variety :पुणे जिल्ह्यातील (Pune District)  इंदापूर तालुक्यातील बोरी येथील शिंदे कुटुंबीयांनी मागच्या दहा वर्षापासून संशोधन करून द्राक्षाचं नवं वाण (New Grape Variety) तयार केलंय.

पांढऱ्या रंगाच्या द्राक्षापासून लाल रंगाचे द्राक्ष तयार करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे.  SMS 55 (SMS 55 Grape Variety) असं या वाणाचं नामकरण करण्यात आलं असून आज त्यांनी हे वाण अधिकृतरित्या रिलीज केलंय. 

पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाच्या माणिक चमन व्हरायटीला सरिता या काळ्या वाणाचे नैसर्गिक पद्धतीने परागीभवन झाले होते. त्यानंतर त्यांना बागेत लाल रंगाचे काही घड आढळून आले. त्याचे सिलेक्शन करून मल्टिप्लिकेशन केले आणि मागच्या आठ-दहा वर्षांमध्ये ट्रायल घेतल्या. यातून त्यांनी हे वाण विकसित केलंय. 

हे वाण जास्त गोड (यामध्ये शुगर कंटेंट जास्त आहे), धुके पडले तरी क्रॅकिंग न पडणारे, उत्पादनाची जास्त क्षमता असणारे आणि हार्वेस्टिंग नंतर टिकवण क्षमता जास्त असणारे आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा या संशोधनाचा नक्कीच फायदा होणार आहे. 

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेतीकृषी योजनापुणे