Join us

Old Land Records : जमिनीचे जुने फेरफार, सातबारे, खाते उतारे पहा मोबाईलवर, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:11 IST

Old Land Records : जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर (Old Land Record see on mobile) पाहता येणार आहेत.

Old Land Records : जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल... 

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

  1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा थेट https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords  या वेबसाईटवर जायच आहे. 
  2. यानंतर दोन ऑप्शन दिसतील एक तर लॉगिन करायचा आहे किंवा लॉगिन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे.
  3. नव्याने नोंदणी करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा. 
  4. यात आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती भरावी. 
  5. यानंतर पासवर्ड क्रिएट करून सबमिट करायचा आहे. आपली नोंदणी होईल. 
  6. पुढे User Id Password ने लॉगिन करायचे आहे.
  7. लॉगिन केल्यानंतर रेगुलर सर्च यावर क्लिक करायचा आहे.
  8. यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. यात कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्ताऐवज आणि व्हॅल्यू अशा पद्धतीचे रकाने दिसतील. 
  9. ज्या कार्यालयाच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र पाहिजे आहेत. ते कार्यालय निवडायचे आहे. 
  10. त्यानंतर जिल्हा निवड, तालुका निवड, गाव निवड, यानंतर कोणता कागद पत्रे हवे आहेत, ते निवडा. 
  11. (आता यात महत्त्वाचा मुद्दा असा की, त्या गावाची जेवढी कागदपत्र उपलब्ध असतील, तेवढेच कागदपत्र दाखवली जातील आणि उपलब्ध असलेली कागदपत्रे पाहायला मिळणार आहेत.) 
  12. त्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करायचा आहे. 
  13. सर्च केल्यानंतर त्या संबंधित कागदपत्र आपल्यासमोर दिसेल. 
  14. अशा पद्धतीने तुम्हाला संबंधित गावाबाबत जे कागदपत्र उपलब्ध असेल ते पाहता येणार आहे.

 

Jamin Mojani : जमीन मोजणीच्या प्रकारात मोठे बदल; आता मोजणी होणार फक्त इतक्या दिवसात

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरी