Onion Crop : नाशिकसह (Nashik) राज्याच्या काही भागात खरीप हंगामातील कांदा लागवडीला सुरवात झाली आहे. काही भागात लागवड आठ दहा दिवस होत आले आहेत.. त्यामुळे कांदा लागवडीची लगबग सुरु असल्याचे चित्र आहे. अशात कांदा लागवडीनंतर नवीन पात निघण्यासाठी किंवा कांदा चांगला राहण्यासाठी काय उपाय योजना करता लागतील, ते पाहुयात...
नाशिक जिल्ह्यात (Nashik Onion Crop) मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. सद्यस्थितीत खरीपातील कांदा लागवड (Onion Cultivation) सुरु झाली आहे. तर काही भागात कमी अधिक दिवसांच्या फरकाने लागवड सुरु आहे. कांदा लागवडीनंतर सुरवातीचे आठ दहा दिवस कांदा रोपे उभ्या राहण्याची प्रक्रिया असते. या दरम्याने एखादे पाणी देखील पिकाला दिले जाते.
कांदा लागवडीच्या आठ दिवसांनंतर...
- दुसऱ्यांदा पाणी देताना जमिनीतून ह्युमिक ऍसिड द्यावे, जेणेकरून रोपांच्या मुळांची वाढ होईल.
- त्यानंतर १९:१९ चा स्प्रे देण्यात यावा. याचे प्रमाण हे पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे.
- यासोबत कीटकनाशक कराटे अर्धा एमएल, तसेच मायक्रोन्यूटन अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संकलन : राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास फाउंडेशन, निफाड, चितेगाव फाटा