Paddy Crop Management : सध्या भात पीक (Paddy Crop) फुलोऱ्यात आले असून अनेक भागात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषतः भंडारा व गोंदिया जिल्हयात व मौदा तालुक्यातील काही भागात गादमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटीकेमधुनच सुरू होत असून सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवडयात अधिक प्रमाणात आढळतो.
गादमाशी कशी ओळखावी?
उशिरा रोवणी केलेले धान, ढगाळलेले वातावरण, रिमझिम पडणारा पाऊस, ८० ते ९० टक्के वातावरणातील आर्द्रता व २६ ते ३० सें. तापमान किडीच्या वाढीस अतिशय पोषक असते. या किडीची प्रौढ माशी डासासारखी दिसत असून रंग तांबडा व पाय लांब असतात. तसेच विश्रांती अवस्थेत पंख पाठीवर पुर्णपणे झाकलेले असतात. गादमाशी मादी १५० ते २०० अंडी एक-एक प्रमाणे थानाच्या पानाच्या खालच्या भागाला देत असून अंडी लांबोळकी व कुंकवाच्या रंगासारखे दिसतात.
अळी अंडयातून तीन ते चार दिवसात बाहेर येत असून बेच्यातुन खाली सरकत जावून जमिनीलगत वाढणाऱ्या अंकुरात प्रवेश करते. अळीचा रंग पिवळसर व पांढरा असतो आणि त्या वाढत्या अंकुरावर १५ ते २० दिवस पर्यत खात असतात. अळी खोडामध्येच कोषावस्येत जाते. व कोषामधुन प्रौढ माशी ५ ते ७ दिवसात बाहेर येते. एक पिढी पुर्ण करण्यास गादमाशीला तीन आठवडे लागतात. अंडयातुन बाहेर पडलेली लहान अळी धानाच्या मुख्य खोडात शिरून बुंध्याजवळ स्थिरावते व त्याच्यावर उपजिविका करीत असते. त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा चंदेरी पोंगा तयार होतो, अशा पोंग्याना लांबी धरीत नाही. तसेच बुंध्याच्या बाजुला अनेक फुटवे फुटलेले दिसतात.
असे करा गादमाशीचे नियंत्रण
१) थाना व्यतिरिक्त इतर पुरक खाद्य वनस्पती उदा. देवधान नष्ट करावे.
२) कापणीनंतर शेतात नांगरणी करून धसकटे नष्ट करावीत.
३) गाद प्रतिबंधक धानाच्या जातीचा वापर करावा. उदा. साकोली-८, साकोली-६, सिंदेवाही -२००१, वैभव, निला, तारा, सुरक्षा इत्यादी.
४) रोवणी करतांना गादमुक्त रोपांची लावणी करावी.
५) गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटीकेत आढळल्यास मातीत भरपुर ओल असतांना १० टक्के दाणेदार फोरेट १० किलो किंवा क्चिनॉलफॉस ५ टक्के दाणेदार १५ किलो प्रति हेक्टर लागवडीच्या रोपांसाठी पुरेसे आहे.
६) रोवणी नंतर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच खालील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.