Join us

Paddy Cultivation : भात, नागली, वरई रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी कशी कराल? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 8:35 PM

Paddy Cultivation : भात, नागली, वरई पिकांच्या रोपवाटिका व्यवस्थापनासाठी काय काळजी घ्यावी, हे समजून घेतलं पाहिजे...

Nagli Crop : पावसाने ओढ दिली असून अनेक भागात पेरण्या (Paddy Sowing) रखडल्या असून अनेक भागात दुबार पेरणीचे संकट उभा राहिला आहे. अशा स्थितीत भात, नागली, वरई पिकांच्या रोपवाटिका व्यवस्थापनासाठी काय काळजी घ्यावी, हे समजून घेतलं पाहिजे... पाहुयात सविस्तर....

भात पिकासाठी....

पावसाचा अंदाज (Rain Update) लक्षात घेता शेतक-यांनी भाताची रोपवाटिका ८ दिवसांच्या अंतराने २ टप्प्यात तयार करावी. रोपवाटीकेतील तण नियंत्रणासाठी १५ मिली ऑक्झीफ्लुरोफेन २३.५ टक्के ई.सी. १० लिटर पाण्यात पेरणीनंतर दोन ते तीन दिवसात फवारावे अथवा ब्युटाक्लोर ५० ई.सी १.५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी फवारण्यात यावे. पेरणी योग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी गादीवाफ्यावर पूर्ण करावी. पेरणी योग्य पाऊस नसलेल्या ठिकाणी १ जून ते ३० जून पर्यंत वाफसा आल्यानंतर बियाण्याची पेरणी गादीवाफ्यावर त्वरित करावी. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा ५०० ग्रॅम नत्र खत द्यावे.

पीक संरक्षण

रोपवाटिकेत वाफ्यात बियाणे टाकतेवेळी किंवा पेरणीनंतर १५ दिवसांनी दाणेदार क्लोरोपायरीफॉस १० टक्के (१० कि. ग्रॅ.) किंवा क्विनालफॉस ५ टक्के (१५ कि. ग्रॅ.) प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावे. खेकड्यांच्या बिळाशेजारी विषारी आमिष ठेवून खेकड्यांचे नियंत्रण करता येते यासाठी एसिफेट ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी (७५ ग्रॅ.) घेऊन १ कि. ग्रॅ. शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. या अमिषाचे १०० लहान - लहान गोळे करून खेकड्यांच्या बिळात टाकावेत.

खरीप नागली पिकासाठी...

पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतक-यांनी नागली पिकाची रोपवाटिका ८ दिवसांच्या अंतराने २ टप्प्यात तयार करावी. पेरणी योग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी खरीप हंगामासाठी रोपवाटिकेसाठी बियाण्याची पेरणी गादीवाफ्यावर पूर्ण करावी. पैरणी योग्य पाऊस नसलेल्या ठिकाणी (जून ते जुलै चा दुसरा पंधरवडा) पर्यंत वाफसा आल्यानंतर बियाण्याची पेरणी गादीवाफ्यावर त्वरित करावी. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर णीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा १ किलो युरिया खत द्यावे. एक एकर क्षेत्र रोप पुनार्लागनीकरीत २-३ गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते.

वरईसाठी काय? 

पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवाना सल्ला देण्यात येतो कि वरई पिकाचे बियाणे गादीवाफ्यावर पेरणी करावी व बियाणे ओळीत पेरावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतक-यांनी वरई पिकांची रोपवाटिका ८ दिवसांच्या अंतराने २ टप्प्यात तयार करावी.

संकलन : ग्रामीण कृषी मौसम सेवा, इगतपुरी 

टॅग्स :भातपेरणीशेती क्षेत्रशेतीनाचणी