Pik Pera Certificate : रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरवात झाली असून रब्बी हंगाम पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. हा अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक असतात. यात आधार कार्ड, बँकेचे पासबुक, सातबारा, पीक पेरा स्वयं घोषणापत्र इत्यादी.
जर का तुम्ही पीक विमा काढत (Pik Vima) असताना पिक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केलेली नसेल. तर अशावेळी पिक विमा फॉर्म भरताना पीक पेरा स्वयंघोषणापत्र बंधनकारक असते. पीक पेरा स्वयंघोषणापत्र (Pik Pera Certificate) हे रब्बी आणि खरीप हंगाम अशा दोन्ही हंगामासाठी आवश्यक असते. शेतकरी ज्याही हंगामात पिक विमा काढत असाल, त्या हंगामाचे पीक पेरा स्वयंघोषणापत्र सोबत असावे लागते. हे स्वयंघोषणापत्र कसे डाउनलोड करायचे ते पाहुयात.
तर सोपं आहे... पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करू शकता. आपल्या मोबाईल देखील हे डाऊनलोड करता येईल.
file:///C:/Users/Lokmat/Downloads/_pik_pera_rabbi_hangam.pdf
तर हे स्वयंघोषणापत्र डाउनलोड केल्यानंतर त्यातील संपूर्ण माहिती भरून ते पत्र पीक विमा अर्जासोबत जोडावे लागते.
- सुरवातीला शेतकऱ्याचे नाव, पत्ता, एकूण जमीन अशी माहिती भरावी.
- यानंतर खालील रकान्यात गाव, गट नंबर, खाते नंबर, क्षेत्र, पिकाचे नाव, पेरलेले क्षेत्र, लागवड दिनांक इत्यादी.
- शेवटी शेतकऱ्याची सही किंवा अंगठा द्यावा, सोबत मोबाईल नंबर लिहावा,
- अशा पद्धतीने स्वयंघोषणापत्र भरता येईल, ते पीक विमा अर्ज करताना जोडता येईल.
हेही वाचा : PM Kisan Status : पीएम किसान योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे? जाणून घ्या एका क्लिकवर