Pik Vima Policy : प्रधानमंत्री पिक विमा (Pik Vima Yojana) योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा पिक विमा भरल्यानंतर आपल्या पॉलिसीची स्थिती चेक करत असताना शेतकऱ्यांना पेड अप्रूव्ह अशा प्रकारे दाखवल्या जाते. म्हणजेच बऱ्याच शेतकऱ्यांना पॉलिसी अप्रूव्ह दाखवते तर काही शेतकऱ्यांना पॉलिसी पेड दाखवते. या दोघांचा नेमका अर्थ काय होतो, पॉलिसी अप्रूव्ह म्हणजेच पीक विमा (Pik Vima Manjur) मंजूर झाला का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून पाहुयात.....
पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांसाठी पीक विमा काढतात. एक रुपयात हा पीक विमा काढला जातो. यानंतर संबंधित पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचा अर्ज केल्यानंतर तपासणी केली जाते. त्यानंतर सदर अर्जावर पुढील प्रक्रिया होत असते. यानंतर शेतकरी अनेकदा अर्जाची स्थिती चेक करत असतो. अशावेळी काही शेतकऱ्यांना अर्जाच्या स्थितीत पेड आणि अप्रूव्हचे पर्याय दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ होतो. ही स्थिती नेमकी कोणत्यावेळी होते, ते समजून घेऊया....
शेतकऱ्यांचा डाटा ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर भरल्यानंतर ती पॉलिसी पेमेंट केल्यानंतर पेडमध्ये जाते. जर त्या पॉलिसीसाठी एक रुपयाचं पेमेंट केले नसेल तर ते अनपेडमध्ये राहते. यानंतर जर पॉलिसीमध्ये काही त्रुटी असेल तर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून त्रुटी काढण्यासाठी प्रक्रिया केली जाते. म्हणजेच अर्ज पुन्हा माघारी पाठवला जातो. त्या त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा ते पॉलिसी पिक विमा कंपनीकडे जाते. सात दिवसांमध्ये त्या पोर्टलवर तपासणी करून ती पुढे पिक विमा कंपनीकडे दिले जाते.
अर्ज पीक विमा कंपनीकडे....
आता पॉलिसी प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन महिन्याच्या आतमध्ये पिक विमा कंपन्याला ती कागदपत्र तपासायचे असतात. त्या शेतकऱ्याचे जे काही क्षेत्र आहे, त्याचे सर्व माहिती मॅच होते का हे चेक करून पुढे ते पेमेंट केल्यानंतर पेडमध्ये अर्ज दाखवला जातो. परंतु योजनेच्या कालावधीनुसार पिक विमा कंपनीच्या माध्यमातून कार्यवाही केली जात नाही. परिणामी तीन-तीन महिने चार चार महिने पॉलिसी पेडमध्ये दिसून येते. मग पेडमध्ये असेल म्हणजे आपली पॉलिसी त्या ठिकाणी सादर झालेली आहे.
तर पीक विमा मंजूर....
म्हणूनच पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जोपर्यंत मंजूर येत नाही, तोपर्यंत पुढील प्रक्रियेस गती मिळत नाही. यामध्ये कंपनी अर्जाची छाननी करेल, कागदपत्र तपासेल, यानंतर तो अर्ज मंजूर होईल व आता अनेक शेतकऱ्यांना वाटते आहे की, आपली पॉलिसी मंजूर झाली म्हणजे पिक विमा मंजूर झाला का? पॉलिसी झाली, म्हणजेच तुम्ही भरलेली पॉलिसी योग्य आहे आणि ती पॉलिसी पिक विमा कंपनीने मंजूर केली आहे, असा त्याचा अर्थ होतो
दोन वेगवगेळ्या बाबी
यानंतरची प्रक्रिया म्हणजे क्लेम, कॅल्क्युलेशन, क्लेम मंजूर, क्लेम रिजेक्ट या सगळ्या बाबी असतात. पॉलिसी तपासत असताना एखादे कागदपत्र चुकीचे असल्यास किंवा भरलेला पिक विमा चुकीच्या पद्धतीने भरलेला असेल किंवा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून तपासणी करताना काही त्रुटी आढळून आल्या, अशा पॉलिसी रिजेक्ट केल्या जातात.
या ठिकाणी पॉलिसी पेड, अनपेड त्याचबरोबर रिव्हरटेड, रिजेक्टेड आणि अप्रूव्ह अशा वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये असते. पॉलिसी अपलोड म्हणजे आपण भरलेला जो पिक विमाचा अर्ज आहे, तो योग्य असून मंजूर झाला आहे, असं सांगितले जाते. म्हणजेच क्लेम अप्रूव्ह, रिजेक्टेडची स्थिती आणि पॉलिसीची अप्रूव्ह, रिजेक्टेड स्थिती या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.