Lokmat Agro >स्मार्ट शेती > Pipe Line Yojana : पाईपलाईन योजनेचा मॅसेज आला का? सात दिवसांत 'हे' काम कराच, वाचा सविस्तर 

Pipe Line Yojana : पाईपलाईन योजनेचा मॅसेज आला का? सात दिवसांत 'हे' काम कराच, वाचा सविस्तर 

Latest News Pipe Line Scheme Subsidy Upload documents if eligible under pipeline scheme read in detail | Pipe Line Yojana : पाईपलाईन योजनेचा मॅसेज आला का? सात दिवसांत 'हे' काम कराच, वाचा सविस्तर 

Pipe Line Yojana : पाईपलाईन योजनेचा मॅसेज आला का? सात दिवसांत 'हे' काम कराच, वाचा सविस्तर 

Pipe Line Yojana : ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत, असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत.

Pipe Line Yojana : ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत, असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

PVC Pipe Yojana :  पीव्हीसी पाईप याचबरोबर एचडीपी अनुदान केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईपसाठी (PVC Pipe Scheme) अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र झाले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत, असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत. या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे 


गेल्या अनेक दिवसांपासून महाडीबीटीची लॉटरी (Mahadbt Lottery) लागण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता हळूहळू काही योजनांच्या लॉटरी लागण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. त्यानुसार सिंचन विभागातील योजनांची लॉटरी लागण्यास (Pipeline Scheme Update)) सुरुवात झाल्याचे पाहायला मिळते आहे. महाडिबीत लॉटरी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. अशा शेतकऱ्यांना पुढील सात दिवसात कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल


पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईपसाठी अनुदान

तर या योजनेच्या माध्यमातून 100 टक्के आहे आणि 50 टक्के अशा पद्धतीचे अनुदान देण्यात येतं. दुसरीकडे राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अशा दोन योजना राबवल्या जातात. या योजनेच्या अंतर्गत जे काही पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईप 428 रुपये मीटर पर्यंत शंभर टक्के अनुदान आहे.

अंतर्गत येणाऱ्या एसटी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. तर सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना, एचडीपी पाईप असतील तर 50 रुपये प्रतिमीटर तर पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 15 हजार रुपयांचा अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकते.

ही कागदपत्रे आवश्यक 

तर आता ज्या शेतकऱ्यांना मेसेज द्वारे कळवण्यात आले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, सातबारा उतारा याचबरोबर कोटेशन अपलोड करण्यासाठी अशी कागदपत्रे लागणार आहेत. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्व संमती दिली जाईल. पूर्व संमती मिळाल्यानंतर तुम्हाला पाईपची खरेदी करायची आहे. खरेदीचे बिल पुन्हा एकदा संकेतस्थळावर अपलोड करायची आहे.

Web Title: Latest News Pipe Line Scheme Subsidy Upload documents if eligible under pipeline scheme read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.