Lokmat Agro >स्मार्ट शेती > Intercropping Farming : केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करा, लाखोंचं उत्पन्न मिळवा!

Intercropping Farming : केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करा, लाखोंचं उत्पन्न मिळवा!

Latest News Plant sesame as an intercrop with banana crops and earn income worth lakhs see details | Intercropping Farming : केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करा, लाखोंचं उत्पन्न मिळवा!

Intercropping Farming : केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करा, लाखोंचं उत्पन्न मिळवा!

Sesame Farming : उन्हाळी हंगामासाठी तिळीचे फुले पूर्णा बियाणे 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर बहारदारपणे फुललेलं आहे.

Sesame Farming : उन्हाळी हंगामासाठी तिळीचे फुले पूर्णा बियाणे 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर बहारदारपणे फुललेलं आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Intercropping Farming : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (krushi Vidyapith Rahuri) द्वारा प्रसारित उन्हाळी हंगामासाठी असलेल्या फुले पूर्णा नावाच्या तीळ जातीचं बियाणे 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर बहारदारपणे फुललेलं आहे. काही शेतकरी बांधवांनी केळी पिकात आंतरपीक म्हणून तीळ पिकाची (Sesame Crop) लागवड केली, तर काही शेतकरी बांधवांनी कापून गेलेल्या केळी पिकाच्या खोडव्यामध्ये तीळ पिकाची लागवड केली. तर काहींनी ठिंबकवर सलग तीळ पिकाची लागवड केली. 

धुळे जिल्ह्यातील (Dhule District) पिंपरी येथील शेतकरी राजेंद्र देवसिंग राजपूत यांनी तीन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली असून यात तीळ पिकाची लागवड केली आहे. यात केळीचे लागवड दिनांक ५ फेब्रुवारी रोजी तर तीळ पिकाची (Sesame Lagvad) लागवड १९ फेब्रुवारी रोजी केली. या शेतकऱ्याने आतापर्यंत कसे नियोजन केले आहे? केळी पिकाला कसा फायदा होतो आहे, समजून घेऊयात.... 

तिळावर बीजप्रक्रिया 
तीळ बियाणे लागवड करताना त्यांनी बियाणास बीज प्रक्रिया केली की, ज्यामुळे बियाणापासून व जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून बियाण्यास चार ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर प्रति किलो बियाणास चोळून लावले. त्यानंतर पेरणीपूर्वी पीएसबी culture २५ ग्रॅम  प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया केली. पेरणी बैलपांबरीने ४५ x १० सेंटीमीटर अंतरावर पाणी दिलेल्या क्षेत्रात वापसा आल्यावर केली. 

पेरणी प्रक्रिया कशी केली? 
पेरणी करताना बियाणे अडीच ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही, याची काळजी घेतली. बियाणे जास्त खोलवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होईल, याची त्यांना पूर्वकल्पना होती. बियाणे तिफनने पेरताना एक किलो बियाणामध्ये मध्ये एक किलो दाणेदार खत आणि शेणखत मिश्रण करून वापरले.

त्यामुळे विशिष्ट पाहिजे असलेल्या अंतरावर पेरणी करता आली. पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली विरळणी आणि 15 ते 20 दिवसांनी दुसरी विरळणी करावी लागली. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या २.२० लाख प्रति हेक्टर इतकी राहील, याची काळजी घेतली. 

खत व्यवस्थापन करताना... 
खत व्यवस्थापन करताना तीळ पिकास चांगले कुजलेले शेणखत पाच टन प्रति हेक्टर त्यासोबत एरंडी पेंड एक टन आणि दहा किलो सल्फर प्रति हेक्टर कुळवणी अगोदर जमिनीत चांगले मिसळून दिलेले होते. रसायनिक खत देताना तीळ पिकास नत्र ६० किलो प्रति हेक्टर स्फुरद ४० किलो प्रती हेक्टर आणि पोटॅश २० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे पेरणी करताना दिले. नत्राची अर्धी मात्रा म्हणजेच ३० किलो देण्यासाठी ६३ किलो युरिया पेरणी करताना दिले तर उर्वरित मात्रा पेरणीनंतर २१ दिवसांनी दिले. नत्राची दुसरी मात्रा दिल्यानंतर पीकास पाणी दिले. अधिक उत्पादननासाठी पीक फुलोऱ्यात अवस्थेत असताना दोन टक्के युरियाची फवारणी केलेली आहे.   

तण नियंत्रणासाठी.... 
साधारणपणे सुरुवातीचा ३५ ते ४० दिवसाचा कालावधी हा स्पर्धाक्षम असल्याने सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण होणे आवश्यक होते. त्यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली कोळपणी व निंदणी, नंतर ३० ते ३५ दिवसांनी दुसरी कोळपणी व गरजेनुसार निंदनी करून पीक तण विरहित ठेवलेले आहे. तीळ पिकाची मुळे ही तंतूमुळे असल्याने जमिनीच्या वरच्या थरात वाढत असल्याने खोल अंतर मशागत केल्यास मुळांना इजा पोहोचते. यांची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी खोलवरची मशागत टाळली. पीक लहान असताना अंतर मशागत करावी लागली. 

पाणी व्यवस्थापन करताना... 
पाणी व्यवस्थापन करताना अत्यंत काळजी घेतलेली आहे. कारण तीळ पाण्यासाठी फारच संवेदनशीआहे. तिळाचे पीक हे पाण्याचा ताण सहन करणारे असले तरी उन्हाळी हंगामात पिकास पाण्याचा ताण पडू दिले नाही. साधारणतः जमिनीच्या मगदूराप्रमाणे बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिलेले आहेत. पिकास फुले येण्याच्या तसेच बोंडे धरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडू नये, म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. तीळ पिकास उन्हाळी हंगामामध्ये पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागणार आहे.
 
पिक संरक्षणाच्या बाबतीत... 
तीळ पिकावर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी व गादमाशी तसेच रस शोषण किडी, तुडतुडे कोळी व पांढरी माशी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  ह्या किडींच्या बंदोबस्तासाठी पहिली फवारणी ५% निंबोळी अर्काची आणि नंतर पंधरा दिवसाच्या अंतराने Quinalphos कीटकनाशक दोन मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी केलेली आहे.

उन्हाळी हंगामात तीळीवर प्रामुख्याने पर्णगुच्छ, मर, खोड व मुळकुज, भुरी हे प्रमुख रोग आढळून येतात. म्हणून त्यासाठी रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाणास बीज प्रक्रिया केलेली आहे. अजून तरी प्लॉटमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही, परंतु केळी पिकावर कॉपर ऑफ क्लोराईड 1500 ग्रॅम प्रति पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी केलेली आहे. त्यासोबत तीळ पिकावरही फवारणी घेतलेली आहे.
   
फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीचा उद्देश 
गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. परंतु एक Cucumber mosaic virus नावाचा  विषाणूजन्य रोग हा नेमका उन्हाळी लागवडीमध्ये जास्त प्रमाणावर होतो. हा रोग होण्यास कारणीभूत असलेले विषाणू हे जवळ जवळ दोन हजार प्रकारच्या Host plants वर उपजत असतात. त्यांना पोषक हवामान ज्यावेळेस मिळते, त्यावेळेस झपाट्याने त्याची वाढ होते. नेमक्या या उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या लागवडीमध्ये तापमान वाढीचा वाईट परिणाम केळी पिकावर होत आलेला आहे. 

आंतरपीक म्हणून तिळाची लागवड 
केळीच्या उन्हाळी लागवडीत कोणत्याही प्रकारचा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करून लागवड केलेली आहे. तीळ पिकास पक्वतेस जास्तीत जास्त १०० दिवस लागतात आणि या १०० दिवसांमध्ये तीळ पिकाची वाढ साधारणता एकशे वीस सेंटीमीटर पर्यंत होत असते.

तीळ पिकाचे पान ही भाल्याच्या आकाराची किंवा भेंडीच्या आकाराची असल्याकारणाने त्या पिकाची सावली छान प्रकारे जमिनीवर पडून या सावलीचा फायदा त्यामध्ये लागवड केलेल्या केळी पिकास उन्हाळ्या हंगामामध्ये होत आहे. झेंडूचे पीक जसं सूत्र कृमींच्या बंदोबस्तासाठी उपयोगी पडते. तसेच तीळ पिकाच्या मुळाजवळ तीळ पिका द्वारा एक विशिष्ट प्रकारचा विषारी वायू तयार होतो. या वायूमुळे केळीच्या मुळावरील वाढलेले पिकासाठी घातक असलेले सूत्र कृमी नैसर्गिकरित्या मरतात व सूत्र कृमींचा बंदोबस्त नैसर्गिक रित्या होतो आणि जमिनीचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

- प्रा. डॉ.सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार, तेलबिया संशोधन केंद्र  जळगाव.
 

Web Title: Latest News Plant sesame as an intercrop with banana crops and earn income worth lakhs see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.