PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजनेची (PM Kisan Scheme) पुढील 19 व्या हफ्त्याची 24 फेब्रुवारी हि तारीख जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लाभार्थी शेतकरी पीएम किसान च्या पोर्टलवर जाऊन लाभाची स्थिती तपासत आहेत. यात लाभार्थी म्हणून पात्र आहे का? हफ्ता येणार का? अर्जात काही त्रुटी तर नाही ना? अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी शेतकरी पीएम किसानच्या (Pm Kisan Portal_पोर्टलला भेट देत आहेत.
शेतकरी Know Your Status चेक करत असताना आपल्या हफ्त्याच्या स्थितीमध्ये FTO Generated No असं दाखवलं जात आहे. आपला FTO जर Generate झालेला (PM Kisan FTO Generate) नसेल तर आपल्याला हप्ता मिळत नाही, अशी देखील चर्चा आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये साहजिकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मग FTO म्हणजेच काय? तो कधी Generate होतो? तुमचं FTO Generate होणार का? FTO generate जर Noअसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून समजून घेऊयात..
RFT म्हणजेच रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर
पीएम किसान योजना असो किंवा इतर काही योजना असेल या योजनांचा लाभ देत असताना जे काही शेतकरी या योजनांतर्गत पात्र होतील किंवा जे काही लाभार्थी पात्र होतील, त्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर (RFT) ही जनरेट केली जाते. साधारणपणे त्या अंमलबजावणी अधिकाऱ्याच्या माध्यमातून समजा राज्य शासन किंवा नोडल एजन्सीच्या माध्यमातून जनरेट केली जाते.
FTO म्हणजेच फंड ट्रान्सपोर्ट ऑर्डर
या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत. त्याच्यासाठी निधीची गरज आहे. हा आरएफटी जनरेट झाल्यानंतर पुढे FTO म्हणजेच फंड ट्रान्सपोर्ट ऑर्डर निघाल्यानंतर साधारण दोन-तीन दिवसांमध्ये किंवा त्याच आठवड्यामध्ये किंवा त्या दिवशी सुद्धा त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जातं. यालाच FTO म्हणतात. FTO हा ज्यावेळेस या योजनेच्या अंतर्गत पैशाचं वितरण करण्यासाठी जिथे फंड ट्रान्सफर ऑर्डर निघेल, ते ट्रान्सफर ऑर्डर निघाल्यानंतर जनरेट होते.
सर्वांना एफटीओ नो दाखवत आहे....
आता लाभार्थी सद्यस्थिती तपासत असताना सर्वांना एफटीओ नो दाखवत आहे. कारण अद्यापही या योजनेच्या हप्त्यासाठीचे आरएफटी साइन झालेले नाही. ही आरएफटी जनरेट केली जाईल. तत्पूर्वी या योजनेच्या लाभार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत काही प्रक्रिया तर पूर्ण करायला सांगितलं होतं. साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आरएफटी केली जाईल. आरएफटी जनरेट झाल्यानंतर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी एफटीओ जनरेट केला जाईल.
समज दूर करावा...
हा एफटीओ जनरेट झाल्यानंतर हफ्त्यांचे वितरण केलं जातं. 24 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे. त्यामुळे सध्या तुम्ही एफटीओ चेक करत असाल तर तुम्हाला एफटीओं जनरेटेड नोच दाखवणार आहे. त्यामुळे नो आहे म्हणून तुमचा हफ्ता येत नाही, हा समज दूर करावा लागणार आहे. त्यामुळे जर तुमची केवायसीची प्रक्रिया योग्यरीत्या पूर्ण असले तर हफ्ता येण्यास अडचण येणार नाही.