PM Kisan Status : केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान (PM Kisan Yojana) निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रति वर्ष 06 हजार रुपयांची मदत केली जाते. तर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची मदत केली जाते. अशा पद्धतीने वर्षभरात शेतकऱ्यांना 12 हजार रुपयांची मदत केली जाते.
तर अनेक शेतकरी अद्यापही नव्याने नोंदणी करत आहेत. या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे. तर जाणून घेऊया पीएम किसान योजनेचे (PM Kisan Status Check) स्टेटस कसे चेक करायचे ते?
- सर्वप्रथम पीएम किसान या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
- यानंतर पहिल्याच लिंकवर क्लिक करा.
- आपल्यासमोर अनेक ऑप्शन्स येतील यातील फार्मर कॉर्नर वरील नो युवर स्टेटस या पर्यावर क्लिक करा.
- यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज दिसेल. या पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर Captcha कोड टाकून घ्या. ओटीपी या बटणावर क्लिक करा.
- (जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास तुम्ही (Know Your Registration Number)र या पर्यायावर क्लिक करून आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे नोंदणी क्रमांक मिळू शकता.)
- मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी पुन्हा रकान्यात भरावा आणि Get Data या बटनावर क्लिक करावे.
- यानंतर आपल्यासमोर अर्ज करताना भरलेली संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला जर यातील काही माहितीत बदल करायचा असेल तर Update your Details बटणावर क्लिक करून तुम्ही ती अपडेट करू शकता. शिवाय आपण सगळी माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
- अशा पद्धतीने अगदी काही वेळात पीएम किसान अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
Rabbi Pik Vima : आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर