PM Kisan Scheme :पीएम किसान सन्मान निधी PM Kisan Yojana) योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेली नोंदणी जर बाद करण्यात आलेली असेल किंवा होल्डवर ठेवण्यात आलेली असेल तर अशा नोंदणीमध्ये कागदपत्र अपलोड कशी करायची? तसेच अर्जात दुरुस्ती कशी करायची? याबद्दलची माहिती या लेखातून समजून घेऊयात..
अशी करा दुरुस्ती
- सर्वप्रथम पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे, या ठिकाणी आपल्या नोंदणीची स्थिती चेक करायची आहे.
- आपल्याला सर्वात प्रथम आपला आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे.
- आधार नंबर एंटर केल्यानंतर बाजूच्या रकान्यात कॅपच्या कोड टाकायचा आहे.
- यानंतर व्हेरिफाय पर्यावरण क्लिक करायचा आहे.
- यानंतर आपल्याला आपल्या नोंदणीची स्थिती समोरील विंडोवर दाखवली जाईल.
- यामध्ये जर आपण योग्यरीत्या कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर कागदपत्र न मिळाल्यामुळे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येईल किंवा अर्जात इतर त्रुटी असल्याचे सांगण्यात येईल.
- यामध्ये जर कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थितरीत्या केली नसेल तर 2019 पूर्वीचा फेरफार आणि जमिनीचा अद्ययावत असा सातबारा ज्याची साईज 200 केबी पर्यंत असणे आवश्यक असते. अशा प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली असेल.
- तर समजा हीच कागदपत्र आपल्याला अपलोड करायची ठरल्यास यासाठी पुन्हा मेन पेजवर यायचे आहे.
- या ठिकाणी असलेल्या अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर्स या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅपच्या कोड टाकायचा आहे.
- त्यानंतर मोबाईल नंबर दाखवला जाईल या नंबर वर एक ओटीपी देखील येईल.
- मोबाईलवर आलेला ओटीपी इंटर मोबाईल ओटीपी या रकान्यात भरायचा आहे.
- त्यानंतर गेट आधार ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- पुन्हा आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी पुन्हा रकान्यात प्रविष्ट करायचा आहे.
- शेवटी सबमिट फॉर ऑथेंटीकेशन या पर्यायावर क्लिक करायचा आहे
- सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती विंडोवर दाखवली जाईल
- जर या माहितीत आपल्याला काय बदल करायचे असेल, तर ते मेन्शन करायचा आहे.
- किंवा जमीन च्या बाबतीत काही अधिक माहिती आपल्याला समाविष्ट करायचे असल्यास ती देखील करू शकता.
- आता सद्यस्थितीत आपण केवळ कागदपत्रे अपलोड कशी करायची आहेत, ते पाहणार आहोत.
- विंडोवर दाखवण्यात येणाऱ्या माहितीत शेवटी कागदपत्र अपलोडसाठी पर्याय दाखवला आहे.
- यामध्ये फाईल निवडा या पर्यायावर क्लिक करून आपण संबंधित कागदपत्रांची फाईल या ठिकाणी निवडू शकता.
- यानंतर शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज पुन्हा एकदा सादर झाल्याचे नॉटीफिकेशन मिळेल.
Jamin Kharedi : जमीन खरेदी करतांना भोगवटादार वर्ग, उताऱ्यावरील शेरे पहाच, वाचा सविस्तर