Lokmat Agro >स्मार्ट शेती > PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? अशी पहा जिल्हावार संपर्क यादी 

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? अशी पहा जिल्हावार संपर्क यादी 

Latest News PM Kisan Scheme Want to complain about PM Kisan Scheme See the district-wise contact list | PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? अशी पहा जिल्हावार संपर्क यादी 

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? अशी पहा जिल्हावार संपर्क यादी 

PM Kisan Scheme : पीएम किसानच्या आता तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचे सिंगल (Nodal Officer for complaints) पॉइंट संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.

PM Kisan Scheme : पीएम किसानच्या आता तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचे सिंगल (Nodal Officer for complaints) पॉइंट संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

PM Kisan Scheme :  शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) योजनेच्या आगामी हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यामध्ये आता तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचे सिंगल (Nodal Officer for complaints) पॉइंट संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. यात राज्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार वाईस सुद्धा तुम्हाला हे नंबर मिळवता येणार आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

अशी पहा संपर्क यादी 

  1. सर्वप्रथम पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. 
  2. पीएम किसान च्या पोर्टलवर आल्यानंतर सगळ्यात शेवटी असलेल्या Search Your Point Of Contact या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  3. सिंगल पॉइंट कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर राजस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे दोन पर्याय दिसतील.  
  4. यातील राजस्तरीय नोडल ऑफिसर यामध्ये महाराष्ट्र राज्याची माहिती अद्ययावत नाही. मात्र जिल्हा माहिती उपलब्ध आहे. 
  5. यासाठी Search District Nodal हा पर्याय निवडायचा आहे. 
  6. यानंतर राज्य आणि जिल्हा निवडून सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  7. उदाहरणार्थ आपण नाशिक जिल्हा निवडला. तर नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या नोडल ऑफिसरची यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील. 
  8. या यादीमध्ये तहसीलदार, कृषी अधिकारी उपलब्ध असतील. 
  9. आता वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळे अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. 
  10. आपल्याला आवश्यक तो जिल्हा निवडून तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जाणून घ्यायचा आहे.

 

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News PM Kisan Scheme Want to complain about PM Kisan Scheme See the district-wise contact list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.