Lokmat Agro >स्मार्ट शेती > Pmfby WhatsApp Number : केवळ नंबर सेव्ह करा अन् पिकविम्याचे स्टेटस व्हॉट्सॲपवर पहा

Pmfby WhatsApp Number : केवळ नंबर सेव्ह करा अन् पिकविम्याचे स्टेटस व्हॉट्सॲपवर पहा

Latest News Pmfby WhatsApp Number Just save number and check Pik vima crop insurance status on WhatsApp | Pmfby WhatsApp Number : केवळ नंबर सेव्ह करा अन् पिकविम्याचे स्टेटस व्हॉट्सॲपवर पहा

Pmfby WhatsApp Number : केवळ नंबर सेव्ह करा अन् पिकविम्याचे स्टेटस व्हॉट्सॲपवर पहा

Pmfby WhatsApp Number : PMFBY च्या माध्यमातून व्हाट्सअप चॅट बोट चालू करण्यात आला आहे. यासाठी एक नंबर प्रकाशित करण्यात आला आहे.

Pmfby WhatsApp Number : PMFBY च्या माध्यमातून व्हाट्सअप चॅट बोट चालू करण्यात आला आहे. यासाठी एक नंबर प्रकाशित करण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Pmfby WhatsApp Number : पीकविमा (Pik Vima Yojana) संदर्भांतील बारीक सारीक गोष्टीसाठी आता कुठेही जायची गरज नाही. किंवा कोणत्याही वेबसाईटवर लॉगिन करण्याची गरज नाही. कारण आता पीक विमा स्टेट्स (Pik Vima Status) आपल्या व्हाट्सअप वर चेक करता येणार आहे. PMFBY च्या माध्यमातून व्हाट्सअप चॅट बोट चालू करण्यात आला आहे. यासाठी एक नंबर प्रकाशित करण्यात आला आहे.

व्हाट्सअपवर कसे चेक करायचे? 

  • सर्वप्रथम Pmfby WhatsApp chat boat 7065514447 हा नंबर आपल्या संपर्क यादीमध्ये जतन करायचा आहे. (तुम्हाला सोयीस्कर होईल या नावाने सेव्ह करायचा आहे.)
  • यानंतर आपल्या मोबाईलमधील व्हाट्सअप उघडायचे आहे. यात आपण सेव्ह केलेला नंबर काढायचा आहे. 
  • नंबर काढल्यानंतर त्यावर Hii असा मेसेज पाठवायचा आहे. लागलीच लागलीच PMFBY चा रिप्लाय येईल.
  • यानंतर आपल्यासमोर आलेल्या रिप्लायमध्ये पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन्स असा पर्याय दिसेल. 
  • सी ऑल ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर इतर सर्व पर्याय दिसतील. (यामध्ये पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस इंटीमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस इत्यादी.)
  • यातील एक उदाहरण पाहूया. जसे की, पॉलिसी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला रिप्लाय येईल. 
  • यात रब्बी 2024, खरीप 2024 किंवा इतर पर्याय असे ऑप्शन दिसेल.  
  • यानंतर आपण पुढील पर्यायांमध्ये 2021 पासून ते 2024 पर्यंतचे रब्बी किंवा खरीप हंगामातील सर्व स्टेटस पाहता येतील. 
  • यातील कोणत्याही एकावर क्लिक केल्यास संबंधित पीक विमा अर्जाची इत्यंभूत माहिती उपलब्ध होईल. 
  • अशा पद्धतीने आपण खरीप रब्बी-हंगामातील विविध पीक विम्याची स्थिती व्हाट्सअपवर पाहू शकता.

 

हेही वाचा : Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती, पेमेंट झालं की नाही हे कसे समजेल?

Web Title: Latest News Pmfby WhatsApp Number Just save number and check Pik vima crop insurance status on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.