Lokmat Agro >स्मार्ट शेती > Rabbi Crop Insurance Application Form : रब्बी पिक विमा अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Rabbi Crop Insurance Application Form : रब्बी पिक विमा अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Latest News Rabbi Crop Insurance Application Form How to fill Rabbi Pik Vima Form Online 2024 Maharashtra | Rabbi Crop Insurance Application Form : रब्बी पिक विमा अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Rabbi Crop Insurance Application Form : रब्बी पिक विमा अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Rabbi Crop Insurance Application : सीएससीच्या माध्यमातून रब्बी पिक विमा अर्ज (Pik Vima Yojana) कसा केला जातो, स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात..

Rabbi Crop Insurance Application : सीएससीच्या माध्यमातून रब्बी पिक विमा अर्ज (Pik Vima Yojana) कसा केला जातो, स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

Rabbi Crop Insurance Application : शेतकरी मित्रांनो पिक विमा फॉर्म (Rabbi crop Insurance) भरण्यासाठी सुरुवातीला pmfby.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. या ठिकाणी आल्यानंतर अर्ज करण्यासाठी फॉर्मर कॉर्नर आणि सीएससी असे दोन पर्याय आहेत. तुम्ही कोणताही एक पर्याय वापरून अर्ज करू शकता. तसेच जो दोन नंबरचा ऑप्शन आहे, त्यामध्ये इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे, त्यामध्ये नुकसान झाल्यानंतर किती तुम्हाला इन्शुरन्स म्हणजेच पीक विमा (Pik Vima) भेटू शकतो. त्यानंतर तिसऱ्या पर्यायात अर्जाची स्थिती जाणून घेता येते. 

सीएससीच्या माध्यमातून रब्बी पिक विमा अर्ज कसा केला जातो, ते पाहुयात ...

  • सर्वप्रथम https://pmfby.gov.in/ या वेबसाईटवर आल्यानंतर एनरोलमेंट पार्टनर्स या ऑप्शनवर क्लिक करून सीएससी हा पर्याय निवडावा. 
  • यानंतर नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल, यात राज्य निवडावे आणि 2024 रब्बी हंगाम प्रधानमंत्री फसल बीमा योजना यावर क्लिक करावे.
  • यानंतर एप्लीकेशन फॉर्म नावाची नवीन विंडो ओपन होईल. यात अर्ज करा यावर क्लिक करावे. 
  • पहिल्या पर्यायात बँक डिटेल्स, त्याचबरोबर इतर माहिती भरावी.
  • यानंतर शेतकऱ्याची माहिती भरावी. जसे की आधार कार्डनुसार असलेले नाव, मोबाईल नंबर, वय, जात, शेतीचा प्रकार, पत्ता, व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. 
  • यानंतर पिकांची माहिती भरावी. यात जिल्हा, तालुका, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत आणि गाव निवडावे. 
  • तर पुढील ऑप्शनमध्ये मिश्र शेतीचा एक पर्याय दिसेल, जर तुम्ही मिश्र शेती करत असाल तर यातील माहिती भरावी. 
  • आणि खाली विविध पिकांची माहिती भरावी. जसे की, पिकांचे प्रकार, किती क्षेत्रावर लागवड ही सगळी माहिती यात भरावी.
  • यानंतर चौथा पर्याय हा कागदपत्रे सबमिट करावयाचा आहे. यात बँकेचे पासबुक, सातबारा, ८ अ, पीक पेरा म्हणजेच स्वयं घोषणापत्र आणि काही जणांचा भाडे करार असल्यास त्याचा टेंनंट करार पत्र जोडणे आवश्यक असते. 
  • आता शेवटी भरलेला अर्ज व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचे आहे.
  • सबमिट केल्यानंतर आपला पॉलिसी नंबर, अकाउंट नंबर, शेतकऱ्याचे नाव, बँकेचे नाव सगळी माहिती समोर दिसते. 
  • यानंतर शुल्क जमा करावयाचे असते. यासाठी मेक पेमेंटवर क्लिक करायचे आहे. पेमेंट झाल्यानंतर त्याची रीतसर पावती ही मिळत असते.
  • एका दिवसाच्या आत पेमेंट करणे आवश्यक असतं, अन्यथा फॉर्म डिलीट होण्याची शक्यता असते. 

 

Web Title: Latest News Rabbi Crop Insurance Application Form How to fill Rabbi Pik Vima Form Online 2024 Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.