Rabbi Kanda : कांदा लागवडीचे खरीप, रागडा व रब्बी असे तीन हंगाम आहेत. रब्बी हंगामात (Rabbi Kanda) मोठ्या प्रमाणात जवळपास ६० टक्के क्षेत्रावर कांदा लागवड केली जाते. आक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बियांची पेरणी करुन डिसेंबर जानेवारी महिन्यात रोपांची पुर्नलागवड केली जाते. कांदा पोसण्याचा बराचसा कालावधी उन्हाळ्यात येतो म्हणून यास उन्हाळ कांदा (Unhal Kanda) देखील म्हणतात. रब्बी कांदा रोपवाटिका आणि रब्बी हंगामातील जाती, याबाबत या लेखातून माहिती घेऊयात...
रब्बी हंगामातील जाती :
१. एन-२-४-१ : कांदे गोलाकार आणि मध्यम ते मोठे असतात. रंग विटकरी, चव तिखट असते. साठवण क्षमता अत्यंत चांगली, साठवणीत चकाकी येते. ५-६ महिने चांगले टिकतात. लागवडीनंतर १२० दिवसांनी काढणीस येतात. हेक्टरी ३० ते ३५ टन उत्पादन.
२. फुले स्वामी ३. ऍग्रीफाऊंड लाईट रेड ४. भिमा किरण ५. भिमा शक्ती ६. अरका निकेतन
बियाणे : कांदा बियाणे १२ ते १५ महिन्यांचे पुढे टिकत नाही. १५ महिन्यांचा साठवणीनंतर त्याची उगवणक्षमता कमी होत जाते. खरीपाच्या जातीचे बी दोन खरीप हंगामाकरीता वापरता येते. रब्बीच्या जातीचे बी फक्त एकाच रब्बी हंगामासाठी वापरता येते. लागवडीचा हंगाम कोणताही असो बी खरंदों में महिन्यातच करावी करण याच हंगामात वी तयार होते. एक हेक्टर कांदा लागवडीकरिता साधारण ८ ते १० किलो बियाणे लागते.
रब्बी कांदा रोपवाटिका
एक हेक्टर कांदा लागवडीसाठी १०-१२ गुंठे क्षेत्र रोपवाटीका करण्यासाठी लागते.
रब्बी हंगामासाठी स्वच्छ सुर्यप्रकाश मिळणारी जागा रोपवाटीकेसाठी निवडावी.
रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करावीत.
वाफ्यांची रुंदी १ मी. उंची १५ सें.मी. व लांबी ३ ते ४ मिटर असावी.
प्रत्येक वाफ्यात दोन घमेले कुजलेले शेणखत, १०० ग्रॅम सुफला १५:१५:१५ आणि ५० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड घालावे व वाफा एकसारखा करुन घ्यावा.
प्रत्येक चौरस मीटरवर १० प्रेम ची पेरावे. १० सें.मी. अंतरावर २ से.मी. खोल रुंदीस समांतर रेषा ओवुन बी पातळ पेरावे.
पेरलेले बी मातीने झाकावे व वाफ्यांना बो उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे.
पेरणीपुर्वी २-३ ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रती किलो बियाण्यास चोळावे.
रोपे निरोगी राहण्यासाठी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम युरिया व ५ ग्रॅम फोरेट रोपांच्या दोन ओळीमधून दयावे आणि बुरशीनाशकाच्या व कीटकनाशकाच्या १०-१५ दिवसाच्या अंतराने फवारण्या द्याव्यात.
लागवडी अगोदर पाणी कमी करावे. त्यामुळे रोपे काटक बनतात.
रोपे उपटण्यापूर्वी २४ तास अगोदर पाणी दिल्यामुळे रोप उपटणे सोपे होते व मुळांना कमी इजा होते.
रब्बी हंगामासाठी ५०-५५ दिवसांनी रोपे लागवडीयोग्य होतात.
- डॉ. राकेश सोनवणे, डॉ. रवींद्र पाटील, कांदा, द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत