Onion Diseases : सद्यस्थितीत रब्बी कांदा लागवड (Rabbi Kanda Lagvad) सुरु झालेली असुन ब-याच शेतक-यांचे कांदा रोपे ही ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यातील सततच्या पावसामुळे मर व करपा रोगाच्या प्रार्दुभावामुळे रोपवाटीकेत (Kanda Ropvatika) खराब झालयामुळे रोपाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कांदा रोपवाटिकेतील मर रोग (Onion Diseases) नियंत्रणात आणण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना करता येतील.
कांद्यावरील रोपवाटीकेतील मर रोग
- कांदा पिकाच्या रोपवाटीकेतील रोपांवर मर रोग हा पयुजॅरियम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
- खरीप हंगामातील हवामान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते.
- रोपवाटीकेत या रोपांची मान जमिनीलगत अचानक कुजून ती कोलमडलेली दिसतात.
- त्याचप्रमाणे जमिनीतील बुरशीमुळे लागवडीनंतरही प्रादुर्भाव होवून मर किंवा सड होते.
उपाययोजना
- कांद्याच्या रोपवाटीकेसाठी जमीन उत्तम निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची असावी.
- रोपे तयार करतांना गादी वाप-यावरच करावीत.
- बियाणे निरोगी, स्वच्छ व खात्रीचे असावे.
- रोपवाटीकेत पेरणी करण्यापुर्वी कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडूर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रकिया करावी.
- बियाणे पुरणीपुर्वी 3 X 1 मी. आकाराच्या गादी वाफ्यावर कॉपर ऑक्झीक्लोराईड 30 ग्रॅम प्रती वाफा या प्रमाणात मिसळावे.
- तसेच पेरणीनंतर 15 दिवसांनी पुन्हा 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन्ही ओळीच्या मधोमध आतावे. लगेच वाफ्याला पोहोच पाणी द्यावे. लागवडीकरिता जमीन उत्तम निचरा होणारी व मध्यम प्रतीची असावी.
- - डॉ. राकेश सोनवणे, डॉ. रवींद्र पाटील, कांदा, द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत