Ration Card Update : रेशनकार्ड (Ration Card Update) अत्यंत महत्वाचे साधन बनले आहे. जर तुम्हीही रेशनकार्ड धारक असाल आणि तुम्हाला तुमच्या रेशनकार्डमध्ये काही बदल करावयाचे असतील, तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुम्हाला रेशनकार्डमधून (ration card) कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असल्यास या लेखातून संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया...
नाव कमी करण्याची प्रक्रिया..
- रेशनकार्डवरील नाव कमी करायचं असल्यास अगदी सोप्या स्टपोमध्ये तुम्ही हे काम करू शकता.
- सुरवातीला प्लेस्टोअरवर जायचं आहे. यावर Mera Ration 2.0 असे सर्च करायचे आहे. हे अँप इंस्टॉल करायचे आहे.
- अँप इन्स्टॉल केल्यानंतर भाषा निवडून Next बटनावर क्लिक करा. आपल्यासमोर मेरा राशन असा इंटरफेस दिसेल.
- त्या खाली Get Started असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
- यातील पहिला एक Beneficiaries User आणि दुसरा आहे Department user आपल्याला पहिला पर्याय निवडायचा आहे.
- यानंतर खाली आधार नंबर विचारला आहे, घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी टाकून लॉग इन करायचे आहे.
- रेशनकार्ड ऑनलाईन असेल तरच तुम्हाला लॉग इन करता येणार आहे.
- यानंतर Create MPIN हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा. हा पिन सदर अँप साठी आवश्यक असणार आहे.
- तुम्हाला सोयीस्कर होईल, अशा पद्धतीने पिन टाकायचा आहे. यानंतर पुढील स्क्रिनवर तुमची संपूर्ण माहिती दिसणार आहे.
- इथे आल्यानंतर Manage Family Details या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या रेशन कार्डवर जेवढी नावे असतील तेवढी दिसतील.
- आता ज्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल संबंधित व्यक्तीच्या Delete या बटनावर क्लिक करा. या
- नंतर तुम्हाला delete करण्याबाबत विचारणा होईल, Yes बटनावर क्लिक करा.
- यानंतर नाव कमी करण्याचे कारण विचारले जाईल, ते व्यवस्थित रित्यावाचून संबंधित पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर Confirm बटनावर क्लिक करा. यानंतर पुन्हा ओटीपी येईल, तो टाकून व्हेरिफाय करायचे आहे.
- यानंतर आपल्यासमोर Your Request Successfully Submit असा मॅसेज दिसेल.
- शिवाय history या पर्यायावर क्लिक करून तुमची आलेली Request पाहू शकता.
Old Land Records : जमिनीचे जुने फेरफार, सातबारे, खाते उतारे पहा मोबाईलवर, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया