Second Hand Tractor : आता सेकंड हँड ट्रॅक्टरची (Second Hand Tractor) बाजारपेठही भारतात वाढत आहे. शेतकरी आता जुन्या ट्रॅक्टरबद्दल खूप जागरूक झाले आहेत आणि कमी पैशामध्ये चांगले मशीन पाहून खरेदी करतात. परंतु काही शेतकरी सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करताना तपासत नाहीत, इथेच पैसे घालवून बसतात. मग एकतर इंजिनशी समस्या किंवा अन्य गोष्टीत खर्च करावा लागतो. मग जुने ट्रॅक्टर खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे या लेखातून पाहुयात....
99 टक्के शेतकरी कोठे चुकतात?
वास्तविक, जेव्हा शेतकरी ट्रॅक्टर खरेदी (Buying Tractor) करण्यासाठी जातात, तेव्हा ते त्यांच्या पातळीवर चांगल्या प्रकारे तपास करतात. त्यात कोणी ट्रॅक्टर चालवून पाहतो, कुणी इंजिन किंवा ट्रॅक्टरच्या इतर पार्टची तपासणी करत असतात. यासह, टायर्सपासून ते ट्रॅक्टरच्या बॅटरीपर्यंत तपासणी केली जाते. यासह, शेतकरी बंधू जुन्या ट्रॅक्टर घेताना पहिल्यांदा पेपर देखील पाहतात, ज्यात ट्रॅक्टरचे नोंदणी प्रमाणपत्र त्याच्या विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्र पण समाविष्ट असते.
परंतु जेव्हा या जुन्या ट्रॅक्टर खरेदी शेतकरी केवळ पेपर पाहून समाधानी होतात. इथेच चूक होते. जेव्हा ट्रॅक्टर डीलनंतर आपण त्याच्या मालकाला काही आगाऊ पैसे देतो. मग जेव्हा स्वतःच्या नावावर ट्रॅक्टरची नोंदणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जातो, तेव्हा त्या ट्रॅक्टरवर अनेक चलन असतात. जे आपल्यालाच भरावे लागतात.
काहीवेळा ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये देखील खराबी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी आपल्या ओळखीचा एखादा गॅरेजवाला आपल्यासोबत नेणे आवश्यक ठरते. जेणेकरून ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये बिघाड असल्यास त्वरित लक्षात येईल. शिवाय ट्रॅक्टरच्या इतरही भागात जर अडचणी असल्यास त्या लागलीच लक्षात येऊन ट्रॅक्टर खरेदी करण्यास टाळतो...
किंवा तुम्ही संबंधित ट्रॅक्टरची इत्यंभूत माहिती आरटीओच्या https://echallan.parivahan.gov.in/ या वेबसाईटवरही जाऊन चेक करून शकता. यात ट्रॅक्टरचा मॉडेल नंबर, खरेदीची तारीख, इंजिनचा नंबर तसेच ट्रॅक्टरवरील आरटीओ नंबर इत्यादींची माहिती मिळत असते.