Second Hand Tractor : अनेक शेतकरी आता नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याऐवजी सेकंड हँड ट्रॅक्टर (Second Hand Tractor ) खरेदी करत आहेत. कारण नवीन ट्रॅक्टरमध्ये इतके पैसे गुंतवण्याऐवजी सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर घेऊन (Tractor Farming) शेतकरी शेती कामे करण्याला प्राधान्य देतात. परंतु बहुतेक शेतकऱ्यांना भीती आहे की जुना ट्रॅक्टर खरेदी करून ते तोट्यात जाऊ शकतात.
१. प्रत्येक बजेटमध्ये उपलब्ध ट्रॅक्टर
- आजच्या काळात, महागाई प्रत्येक क्षेत्राला भेडसावत आहे आणि ट्रॅक्टर उद्योगही त्यापासून दूर नाही.
- हेच कारण आहे की वेगाने महाग होत असलेले नवीन ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्याच्या बजेटमध्ये बसत नाहीत आणि बहुतेक शेतकरी सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करत आहेत.
- पण शेतकरी हा जुना ट्रॅक्टर खरेदी करताना नेहमीच गोंधळलेले असतात की हा तोट्याचा व्यवहार ठरू शकतो.
- पण जर तुम्ही योग्य सेकंड हँड ट्रॅक्टर घेतला तर हा खरोखरच एक अतिशय हुशार निर्णय ठरू शकतो.
- म्हणूनच आम्ही तुम्हाला सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करण्याचे फायदे सांगत आहोत.
२. व्यवहार करून पैसे वाचवू शकता
- जेव्हा तुम्ही नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये जाता तेव्हा तिथे व्यवहार करता येत नाही.
- पण जर तुम्ही जुना ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर व्यवहार करण्याला खूप वाव असतो.
- जेव्हा तुम्ही सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करायला जाता तेव्हा काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास तुम्हाला त्यात काही मोठ्या किंवा लहान त्रुटी आढळतील.
- या कमतरतांमुळे, व्यवहार करता येतो. आणि बरेच पैसे वाचवू शकता.
- ट्रॅक्टर खरेदी करताना, त्याच्या टायर्सचे आयुष्य आणि क्रॅक तपासा, मीटर काम करत आहे की नाही, रीडिंग बरोबर आहे की नाही, सर्व्हिस बुक केल्यानंतर सर्व नोंदी ठेवल्या आहेत की नाही ते तपासा.
- इंजिनवर काही विशेष काम झाले आहे किंवा ते मूळ स्थितीत आहे. हे तपासून घेतल्यास चांगले राहते.
३. काम थांबून राहत नाही
- नवीन ट्रॅक्टर खरेदी करताना, अनेकदा वेटिंगवर थांबावे लागते.
- अशावेळी शेतीची अनेक कामे थांबून राहतात.
- प्रथम तुम्हाला काही पैसे देऊन ट्रॅक्टर बुक करावा लागतो आणि नंतर काही दिवसांनी तुम्हाला ट्रॅक्टर मिळतो.
- पण सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करताना तुम्हाला ही अडचण येत नाही.
- जुना ट्रॅक्टर खरेदी करताना, तुम्ही मागील मालकाला पैसे देताच, दुसऱ्याच क्षणी ट्रॅक्टरच्या चाव्या तुमच्या हातात असतात.
- म्हणूनच, जे शेतकरी तातडीने ट्रॅक्टर खरेदी करू इच्छितात, त्यांच्यासाठी सेकंड हँड ट्रॅक्टर हा एक चांगला पर्याय आहे.
४. अनेक वर्ष वापरू शकता
- एकदा शोरूममधून नवीन ट्रॅक्टर घरी येताच, त्याची किंमत लगेचच खूप वेगाने कमी होऊ लागते.
- अशा परिस्थितीत, नवीन ट्रॅक्टर खरेदी करणारा शेतकऱ्याने विक्रीस काढला तर तो खूप कमी किमतीत विकावा लागतो.
- पण जर तुम्ही नवीन ट्रॅक्टरच्या निम्म्या किमतीत सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी केला असेल, तर तुम्ही तो अनेक वर्षे वापरू शकता.
- आणि नंतर तो दुसऱ्याला थोड्या काही पैशात विकू शकता.
- जर ट्रॅक्टरची देखभाल चांगली केली तर तुम्हाला तुमच्या सेकंड हँड ट्रॅक्टरलाही चांगली किंमत मिळेल.
Second Hand Tractor : सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करताय, 'या' गोष्टी हमखास लक्षात ठेवा!