Join us

Solar Pump Vendor : सोलर पंप कंपनी निवडतांना 'या' गोष्टी विसरू नका? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:15 IST

Solar Pump Vendor : सोलर पंप योजनेट सध्या वेंडर (Magel Tyala Solar pump) निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Solar Pump Vendor : सोलर पंप योजनेट सध्या वेंडर (Magel Tyala Solar pump) निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांसमोर कंपनी निवड कशी करावी? कोणती कंपनी निवडावी? कोणती कंपनी चांगली आहे आणि या योजनेमध्ये लाभार्थ्यांसाठी कंपनी निवड का महत्वाची आहे, हे प्रश्न उपस्थित होतात. याच प्रश्नाची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात...

आता यापूर्वी वेंडर निवड (Solar Pump Vendor) कशी करायची, याबाबत आपण जाणून घेतले आहे. मात्र कंपनी निवडतांना शेतकरी संभ्रमात  आहे. म्हणजे नेमकी कोणती कंपनी निवडावी? कंपनी निवडताना काय काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती घेऊयात... 

  • मागेल त्याला सोलर पंप या वेबसाईटवर वेंडरची यादीसोबत संपर्क क्रमांक देण्यात आले आलेले आहेत. 
  • तुम्हाला जवळ असलेल्या कंपनीशी संपर्क करून माहिती घ्या. जसे इन्स्टॉलेशन प्रक्रिया कशी आहे? सर्व्हिस सेंटर कुठे आहे? इत्यादी. 
  • त्यानंतर साहित्य कोणत्या कंपनीचे असते? त्याची क्षमता कशी आहे? तसेच इन्स्टॉलेशन झालं तर सर्व्हिस कशी मिळणार? हे विचारावे. 
  • तसेच तुमच्या भागामध्ये कोणत्या कंपनीचे इन्स्टॉलेशन अधिक आहे, हे तपासण्याचा प्रयत्न करा. 
  • याचबरोबर कंपनी निवडताना कंपनीबाबत माहिती जाणून घ्या. यासाठी वेगवगेळ्या माध्यमांचा वापर करा. शेतकऱ्यांशी बोला.  
  • कंपन्या असतात त्या सर्विस देऊ शकत नाही, पण मटेरियल एखाद्या वेळेस नवीन कंपनीचे सुद्धा चांगला असू शकतात. 
  • तसेच आजूबाजूला शेतकरी वापरत असलेला सोलर पंप कसा चालतो? तो कशावर आहे. काहीजण विहिरीवर लावतात, तर काहीजण बोअरवर लावतात. सेम कंपनीचा कधी बोअरवर चालत नाही, कारण बोअरवर खोली जास्त असते, पाण्याची उपलब्धता नसते, त्या बोअरला पाणीच कमी असतं. विहीर आणि बोअरमध्ये फरक असतो, ही सर्व माहिती घ्यायची. 
  • आपल्याला जर समाधानकारक उत्तरे मिळाली, की ती कंपनी निवडायची. 
  • अशाप्रकारे कंपनीविषयी सगळी माहिती घेऊन कंपनी निवडायची आहे. जेणेकरून सोलर पंप इंस्टॉल झाल्यानंतर काही अडचणी आल्यास कंपनीचा प्रतिसाद मिळणे आवश्यक ठरते.  

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर

 

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरी