Join us

Tomato Crop Management : टोमॅटो पीक मर रोगापासून वाचविण्यासाठी 'हे' उपाय कराच, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 15:36 IST

Tomato Crop Management : झाड कोलमडून मरते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या (Tomato Crop) खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो.

Tomato Crop Management : टोमॅटो पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव (Crop Disease) होतो. सुरुवातीला पानाचे देठ गळणे, शिरा रंगहीन होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतर झाडाची जुनी खालच्या बाजूची पाने पिवळी पडतात. नवीन पाने तपकरी होऊन कुजतात. त्यामुळे झाडांचा अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी, झाडाची वाढ खुंटते. झाड कोलमडून मरते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या (Tomato Crop) खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो.

व्यवस्थापन

  1. पिकाची फेरपालट करावी.
  2. वांगी, मिरची व बटाटा या पिकांव्यतिरिक्त इतर पिकांची लागवड करावी.
  3. रोगग्रस्त झाडे, पीक अवशेष गोळा करून नष्ट करावीत.
  4. नत्रयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात करावा.
  5. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
  6. निचऱ्याची जमीन निवडावी.
  7. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी.
  8. चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करावा.
  9. लागवडीवेळी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ किलो प्रति एकर प्रमाणे शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे.
  10. पुनर्लागवड करताना रोपांची मुळे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लावावीत.

 

रासायनिक नियंत्रण

(३१.८ ईएस) २.५ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथिल (३८%) कासुगामायसिन (२.२१% एससी) २.५ मेटॅलॅक्सिल एम (३१८ ईएस) २.० मि.ली. किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची ५० ते १०० मि.ली. प्रति झाडास ओळीलगत आळवणी करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र इगतपुरी 

टॅग्स :टोमॅटोपीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्र