Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tractor Steering System : ट्रॅक्टर पॉवर स्टिअरिंग घ्यायचा कि मॅन्युअल, कुठला बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Tractor Steering System : ट्रॅक्टर पॉवर स्टिअरिंग घ्यायचा कि मॅन्युअल, कुठला बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Latest News Tractor Tips tractor with power steering or manual Read in detail | Tractor Steering System : ट्रॅक्टर पॉवर स्टिअरिंग घ्यायचा कि मॅन्युअल, कुठला बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Tractor Steering System : ट्रॅक्टर पॉवर स्टिअरिंग घ्यायचा कि मॅन्युअल, कुठला बेस्ट राहील? वाचा सविस्तर 

Tractor Steering System : अनेक शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत की त्यांनी मॅन्युअल स्टीअरिंग (Tractor Tips) खरेदी करावे की पॉवर स्टीअरिंगवर पैसे खर्च करावे. 

Tractor Steering System : अनेक शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत की त्यांनी मॅन्युअल स्टीअरिंग (Tractor Tips) खरेदी करावे की पॉवर स्टीअरिंगवर पैसे खर्च करावे. 

शेअर :

Join us
Join usNext

Tractor Steering System :  आजकाल, जवळजवळ प्रत्येक श्रेणीतील ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टीअरिंग (Tractor Steering System) आणि मॅन्युअल स्टीअरिंगचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे, अनेक शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत की त्यांनी मॅन्युअल स्टीअरिंग (Tractor Tips) खरेदी करावे की पॉवर स्टीअरिंगवर पैसे खर्च करावे. 

ट्रॅक्टर ही अशी एक गोष्ट आहे, ज्यावर शेतकरी आपला बहुतेक वेळ घालवतो. शेतीच्या कामात ट्रॅक्टर बहुतांश कामे पार पाडतो. मात्र काहीवेळा ट्रॅक्टर चालवण्यास अडचणी येत असतात. यावर उपाय म्हणून पॉवर स्टिअरिंग ट्रॅक्टर वापरण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र अनेक शेतकऱ्यांना पॉवर स्टीअरिंगवर पैसे खर्च करावेत की मॅन्युअल स्टीअरिंगवर या गोंधळात पडतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर ..... 


मॅन्युअल स्टिअरिंगचे फायदे आणि तोटे

फायदे 

  • मॅन्युअल स्टीअरिंग खूप सोपे आहे आणि कमी भाग वापरला जातो.
  • कमी भाग वापरल्यामुळे, त्याचा मेन्टनन्स करणे सोपे जाते.
  • हलक्या आणि मध्यम आकाराच्या ट्रॅक्टरसाठी मॅन्युअल स्टीअरिंग योग्य आहे.

 

तोटे 

  • मॅन्युअल स्टीअरिंगमध्ये, ट्रॅक्टर फिरवण्यासाठी ड्रायव्हरला खूप जोर लावावा लागतो.
  • जर ट्रॅक्टर उभा करायचा असेल किंवा पाठीमागे लावायचा असेल तर त्यासाठी खूप शारीरिक ताकद लागते.
  • मॅन्युअल स्टीयरिंगसह ट्रॅक्टर बराच वेळ चालवल्याने लवकर थकवा येतो.
  • मॅन्युअल स्टीअरिंगसह अचूक नियंत्रण कठीण आहे.

 

पॉवर स्टीअरिंगचे फायदे आणि तोटे

फायदे 

  • पॉवर स्टीअरिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आराम.
  • पॉवर स्टीअरिंगसाठी चालकाला कमीत कमी कष्ट घ्यावे लागतात.
  • यामुळे न थकता ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरवर काम करू शकता.
  • जड ट्रॅक्टरसाठी पॉवर स्टीअरिंग खूप सोयीस्कर आहे.

 

तोटे 

  • पॉवर स्टीअरिंगमध्ये ट्रॅक्टरचे सर्वच पार्टस वापरले जातात. 
  • अधिक पार्टस वापरले जात असल्याने ते खराब होण्याची शक्यता असते.
  • यामुळे, त्याच्या देखभालीवरही अतिरिक्त पैसे खर्च होतात.
  • पॉवर स्टीअरिंगमुळे ट्रॅक्टर अतिरिक्त खर्च करावा लागतो. 

 

Tractor Maintenance Tips : ट्रॅक्टरचे इंजिन अधिक गरम होऊ नये म्हणून, या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

Web Title: Latest News Tractor Tips tractor with power steering or manual Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.