Second Tractor Loan : सध्या महागाई वाढली असून शेतकऱ्यांना काही वस्तू घेण्यासाठी मोठा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. आजघडीला शेतीकामासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरची किंमत (Tractor Price) झपाट्याने वाढली आहे. दुसरीकडे शेती व्यवसायात सातत्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत नवा ट्रॅक्टर खरेदी करणे म्हणजे अवघड काम झाले आहे. त्यामुळे चांगल्या स्थितीतील जुने ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे कल वाढतो आहे.
शिवाय जुने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लोन देखील शेतकरी घेत आहेत. जुना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देतात. या कर्जाला यूज्ड ट्रॅक्टर लोन किंवा सेकंड हँड ट्रॅक्टर लोन असेही म्हणतात. आता हे लोन नेमकं कसे मिळते, यासाठी कुठली कागदपत्रे आवश्यक असतात? काय प्रक्रिया असते? याबाबत थोडक्यात माहिती घेऊयात....
ट्रॅक्टरसाठी कर्ज कुठून मिळवायचे?
जेव्हा जेव्हा तुम्हाला ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्यावे लागते, तेव्हा नेहमी सर्वात कमी व्याजदराने कर्ज देणारी बँक निवडा. साधारणपणे ट्रॅक्टर कर्जावरील व्याजदर ९ टक्के असतो. ट्रॅक्टरसाठी कर्जासाठी सरकारी बँका, खाजगी बँका कर्ज देत असतात. ट्रॅक्टरसाठी कर्ज अशा ठिकाणाहून घ्या, जिथे व्याजदर सर्वात कमी आहे.
कर्ज घेताना..
साधारणपणे, सरकारी बँका कोणत्याही कर्जासाठी कमी व्याजदर आकारतात आणि म्हणूनच बहुतेक शेतकरी सरकारी बँकांकडून ट्रॅक्टर कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. परंतु सरकारी बँकांची समस्या अशी आहे की त्यांची कर्ज देण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि कडक आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही कमतरता असेल किंवा तुमच्या पात्रतेमध्ये काही कमतरता असेल तर सरकारी बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होते.
कोणती कागदपत्रे लागतील?
आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचे पासबुक, जमिनीच्या मालकीचा मूळ दाखला, २ पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारशी जोडलेला मोबाईल नंबर, जमाबंदी पावती.
ट्रॅक्टर कर्जासाठी पात्रता
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
किमान २-३ एकर जमीन असावी.
जमीन अर्जदाराच्या नावावर असावी.
अर्जदाराचा CIBIL स्कोअर चांगला असावा.