Lokmat Agro >स्मार्ट शेती > Unhal Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटोची पुनर्लागवड करतांना हे काम करा, उत्पन्न दुप्पट मिळवा!

Unhal Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटोची पुनर्लागवड करतांना हे काम करा, उत्पन्न दुप्पट मिळवा!

Latest News Unhal Tomato Lagvad Precautions to be taken while replanting summer tomatoes see details | Unhal Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटोची पुनर्लागवड करतांना हे काम करा, उत्पन्न दुप्पट मिळवा!

Unhal Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटोची पुनर्लागवड करतांना हे काम करा, उत्पन्न दुप्पट मिळवा!

Unhal Tomato Lagvad : उन्हाळी हंगामात टोमॅटोची रोपे पुनर्लागवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी...  हे जाणून घेऊयात..

Unhal Tomato Lagvad : उन्हाळी हंगामात टोमॅटोची रोपे पुनर्लागवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी...  हे जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

Unhal Tomato Lagvad : उन्हाळी हंगामात टोमॅटोची (Summer Tomato farming)  रोपे 25-30 दिवसांची आणि 8-10 सेमी उंचीची झाल्यावर पुनर्लागवड केली जाते. टोमॅटोची रोपे पुनर्लागवड करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी... 


उन्हाळी टोमॅटो पुनर्लागवड

  • शेतामध्ये सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून घ्यावेत. 
  • टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. 
  • लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी.
  • पुनर्लागवडीपूर्वी रोपवाटिकेमध्ये साधारणतः एक आठवडा अगोदर पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी. म्हणजे रोपे कणखर होतात.
  • लागवडीसाठी वाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज निघतात.
  • पुनर्लागवडीसाठी २५ ते ३० दिवसांची, १० ते १५ सें.मी. उंच व साधारण ६ ते ८ पाने असलेली रोपे निवडावीत.
  • लागवडीसाठी योग्य वाढीची सशक्त रोपे निवडावीत. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे वा
  • पातळ खोड असणारी तसेच रोगट रोपे पुनर्लागवडीसाठी वापरू नयेत.
  • पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ४ मि.ली. अधिक मेटॅलॅक्झिल एम (३१.८ इएस) ६ ग्रॅम
  • किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात १०-१५ मिनिटे बुडवून घ्यावीत. 
  • नर्सरीमधून आणलेल्या रोपांच्या ट्रेमध्येच वरील द्रावणाची आळवणी करावी.
  • दोन रोपांत साधारण ३० सें.मी. आणि सरीत ९० सें.मी. अंतर ठेवून टोमॅटो रोपांची लागवड करावी. 
  • रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. नाजूक खोड ताबडतोब पिचल्याने अशी रोपे नंतर दगावतात.
  • लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे.
  • लागवडीनंतर दहा दिवसांनी मेलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावावीत.
  • रबी हंगामातील टोमॅटो पीक फुलोरा अवस्थेत असल्यास खुरपणी करून शेत स्वच्छ करावे व खताची मात्रा द्यावी.
  • टोमॅटो पिकास आधार देण्याचे काम पूर्ण करावे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Unhal Tomato Lagvad Precautions to be taken while replanting summer tomatoes see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.