Lokmat Agro >स्मार्ट शेती > Unhali Bhuimung : जास्तीचं उत्पादन घ्यायचंय, भुईमुंगात आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर 

Unhali Bhuimung : जास्तीचं उत्पादन घ्यायचंय, भुईमुंगात आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर 

Latest News Unhali Bhuimung do inter-cultivation groundnut in summer for more production read in detail | Unhali Bhuimung : जास्तीचं उत्पादन घ्यायचंय, भुईमुंगात आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर 

Unhali Bhuimung : जास्तीचं उत्पादन घ्यायचंय, भुईमुंगात आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर 

Unhali Bhuimung : खरीप हंगामाच्या (Kharip Hangam) तुलनेत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भुईमूग पिकापासून निश्चितच जास्त उत्पादन मिळते.

Unhali Bhuimung : खरीप हंगामाच्या (Kharip Hangam) तुलनेत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भुईमूग पिकापासून निश्चितच जास्त उत्पादन मिळते.

शेअर :

Join us
Join usNext

Unhali Bhuimung :  स्वच्छ वातावरणामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे खरीप हंगामाच्या (Kharip Hangam) तुलनेत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भुईमूग पिकापासून निश्चितच जास्त उत्पादन मिळते. अर्थातच हे जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी पीक व्यवस्थापनही चांगले करणे गरजेचे असते. 

पीक व्यवस्थापनात उभ्या पिकातील मशागतीला म्हणजेच आंतरमशागतीला (Summer Ground nut Farming) अनन्यसाधारण असे महत्त्व असते, कारण व्यवस्थापनाच्या या महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष झाले तर उत्पादनात कमालीची घट येतें.

“उन्हाळी भुईमुगामध्ये करावयाची आंतरमशागतीची कामे”

  • भुईमुगातील आंतरमशागतीमध्ये पिकाच्या उगवणीनंतर ज्या ठिकाणी नांगे पडले असतील तेथे बियाणे पेरून हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य ठेवणे व ज्या ठिकाणी रोपांची दाटी झाली असेल तेथे विरळणी करणे गरजेचे असते

 

  • भुईमूग पिकात व त्यामध्ये वाढणाऱ्या तणांमध्ये साधारणपणे पेरणीनंतरची ३० ते ३५ दिवस तीव्र स्पर्धा असते. तणांचा नायनाट करण्यासाठी २ कोळपण्या १० दिवसाच्या अंतराने कराव्यात. त्यासाठी पीक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली व ३० ते ३५ दिवसाचे होताच दुसरी कोळपणी करावी

 

  • दुसरी कोळपणी खोल करावी आणि शक्य झाल्यास याच काळात करता आल्यास तिसरी कोळपणी करावी. पहिल्या कोळपणीनंतर खुरपणी करून पिकाच्या दोन ओळीतील तणे नष्ट करावीत

 

  • पेरणीनंतर ३५ दिवसांनी भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत शिरू लागल्या म्हणजे कोळपणी किंवा खुरपणी करू नये. मात्र पीक ४० तसेच ५० दिवसाचे झाल्यावर २ वेळा पिकावर २०० लिटर क्षमतेचा मोकळा ड्रम फिरवावा. 

 

  • पिकावर रिकामा ड्रम फिरवल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागातून निघालेल्या आ-या जमिनीत न शिरता जमिनीच्या पृष्ठभागावर लोंबकळत राहून त्यास शेंगा लागत नाहीत. ड्रम फिरवताना जमिनीत ओलावा असणे मात्र गरजेचे असते. 

 

 

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ

Web Title: Latest News Unhali Bhuimung do inter-cultivation groundnut in summer for more production read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.