Lokmat Agro >स्मार्ट शेती > Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर 

Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Use of 'Turmeric booster' for micronutrients in halad crop see details | Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर 

Turmeric Booster : हळद बूस्टर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर 

Turmeric Booster : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हळद पिकासाठी हळद बुस्टर (Turmeric Booster) देण्यात आले.

Turmeric Booster : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हळद पिकासाठी हळद बुस्टर (Turmeric Booster) देण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

Turmeric Booster :  भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, आणि संत नामदेव सेवाभावी संस्था, संचलित कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर तर्फे प्रथम पिक पंक्ती प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत मौजे. गणेशपुर ता. सेनगाव, जि. हिंगोली येथील १० शेतकऱ्यांची निवड करून डॉ. पी. पी. शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हळद बुस्टर (Turmeric Booster) देण्यात आले.

हळद बुस्टरचे फायदे 

पिकांच्या गुणवत्तेत उत्तम प्रकारची वाढ दिसून येत आहे.
पिकांचे आरोग्य, गुणवत्ता आणि उत्पादन सुधारते.
पाण्यात विरघळणारे आणि साध्या किंवा जटिल मानक खतांशी सुसंगत.
सुलभ वाहतूक आणि एक वर्षापर्यंत दीर्घ टिकवण क्षमता.

हळद बूस्टर वापरण्याची पद्धत :
लागवडीनंतर ६० दिवसांनी आणि ९० दिवसांनी दोनदा फवारणी करावी.
पहिली फवारणी 200 ली पाण्यात एक किलो टर्मरिक बुस्टर घेऊन फवारणी करावी’
दुसरी फवारणी 300-400 ली पाण्यात दीड ते दोन किलो टर्मरिक बुस्टर घेऊन फवारणी करावी. (प्रमाण : 5 ग्राम प्रती लीटर पाणी )
फवारणीची वेळ सकाळी 6 ते 11 वा. व दुपारी 4 ते 6 वा.

सूचना : हळद बूस्टर वापरताना इतर कोणत्याही वनस्पती संरक्षण रसायनांममध्ये (कीटकनाशके बुरशीनाशके इ.) मिसळू नये.

यावेळी साईनाथ खरात विषय विशेषज्ञ (मृदाशास्त्र) यांनी हळद पिकामध्ये खत व्यवस्थापन, हळद बूस्टर याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, अत्यावश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी आणि हळद पिकाच्या वाढीस चालना देण्याकरिता 'हळद बुस्टर' हे सूक्ष्म पोषक आहेत, जमितील झिंक, बोरॉन, लोह सारख्या सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यास मदत होते, इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास चागला उपयोग होतो. या तंत्रज्ञानाची नवीनता म्हणजे वनस्पतींद्वारे आवश्यक पोषक द्रव्यांचे शोषण वाढवते. 

आयआयएसआरने (ICAR - Indian Institute of Spices Research, Kohzikode, Kerala) पिक/माती विशिष्ट म्हणजे आले आणि हळद (सामू (pH) 7 पेक्षा कमी आणि वरील मातीसाठी), सूक्ष्म पोषक मिश्रणे विकसित केली आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती कदम कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला गणेशपुर येथील प्रगतशील शेतकरी, प्रल्हाद मुरमुरे (सरपंच) श्री. गणेश कुलकर्णी पांडुरंग कुरे, बीराजी मारुती वाणी, प्रल्हाद कोकाटे, रवींद्र गडदे, अर्जुन कपाटे व इतर सर्व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. 

संकलन : कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जिल्हा हिंगोली 

Web Title: Latest News Use of 'Turmeric booster' for micronutrients in halad crop see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.