Mushroom Farming : अनेक राज्यात भाताचा खालचा गवतासारखा भाग म्हणजे काड किंवा पेंढा (Mushroom Farming) हा प्रत्यक्ष वैरणीसाठी वापरतात. तर काही राज्यात त्याचा मशीनमध्ये चुरा करून त्यात पेंड, आंबवण, काही हिरवा चारा घालून वैरण म्हणून वापरतात. तर भाताच्या काडाचा किंवा पेंढ्यांचा (Bhatachya Pendhya) उपयोग प्रामुख्याने मशरूम शेतीसाठी केला जातो, जाणून घेऊयात सविस्तर
मशरूम लागवडीत भाताच्या काडाचा उपयोग
भरपूर प्रथिने, जीवनसत्वे आणि उच्च दर्जाची पौष्टिकता या गुणधर्मामुळे अळिंबी लोकांना आवडू लागली आहे. यासाठी भातपिकाच्या काडाचा (Rice Straws) वापर यात केला जातो. 'व्हलवेरिएल्ला स्पेसीज' ही भाताच्या काडावर येणारी अळिंबीची जात होय. या जातीस लागवडीस ३०० ते ४०० सें.ग्रे. तापमान लागते. भाताच्या काडाच्या २ ते २ फूट लांब व ६ ते ८ इंच व्यासाच्या पेंड्या तयार कराव्या लागतात.
त्या थंड पाण्यात ८ ते १० तास भिजवून, नंतर गरम पाण्यात (७०० ते ८०० सें.ग्रे.) अर्धा तास भिजवून, निर्जंतूक करुन थंड झाल्यावर प्लॅटफॉर्मवर पेंढ्याचे उभे आडवे चार थर देतात. प्रत्येक थरावर कडेने स्पॉन (बी) पेरतात व त्यावर प्लॅस्टिकचे आवरण झाकतात. १५ ते २० दिवसांनी आवरण काढल्यावर पाण्याची फवारणी करतात. त्यानंतर २ ते ३ दिवसांत अळिंबीचे पीक दिसू लागते. एक महिन्याला एक असे २ ते ३ वेळेस पीक मिळते. अळिंबी बाजारात ताजी व वाळवलेली विकली जाते.
भाताच्या भुशाच्या राखेचे मूल्यवर्धन
भातपिकाच्या भुशात खनिज घटकांची संख्या ३० आहे. यात सिलिका हे प्रमुख आहे. कच्च्या विटा तयार करताना मातीच्या चिखलात गवताचे तुकडे व भाताचा भुस्सा वापरतात. चिनी मातीचे पाईप, विटा, नळ्या, टँक, पाण्याच्या नळ्या वगैरेंत लाईनिंग (गिलावा) करण्यासाठी भाताच्या मुशाच्या राखेचा वापर करता येईल.
भातकाडाच्या आच्छादनाचा वापर
- शोभेच्या वस्तू एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेताना पेंढ्याचा वापर त्यात केलेला आढळतो.
- काचेचे साहित्य, त्याचप्रमाणे नाजूक भांड्याच्या पॅकिंगसाठी पेंढ्याचा वापर करतात.
- काही फळभाज्यांच्या आयाती- निर्यातीमध्ये पेंढ्याचा वापर त्यांच्या खोक्यांतून, डालग्यांतून, पाट्यातून अथवा टोपल्यांतून केलेला पहावयास मिळतो.
- कोकणामध्ये तर प्रत्येक घराघरांतून, माळ्यांवर आंबे पिकविण्यासाठी पेंढ्याचा वापर आच्छादन म्हणून 'आंब्याची अढी' घालण्यासाठी केलेला दिसून येतो. अवर्षणप्रवण भागात पाणी साठवून ठेवणे आणि पाण्याचे व्यवस्थापन मर्यादित काळात करण्यासाठी अलीकडे आच्छादनाचा वापर केलेला पाहावयास मिळतो. बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे ७० टक्के ओल उडून जात असते.
- ती थोपवून धरण्यासाठी शेतातील निरुपयोगी काडी, कचरा, धसकटे, गवत, तुरकाड्या यांबरोबर भाताचे निकृष्ट काड वापरले जातात.
- हे पदार्थ पिकाच्या दोन ओळीत जमिनीवर हेक्टरी ५ टन पसरावे. आच्छादनाच्या वापरामुळे २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते.
- अशा रितीने अवर्षणकाळात कोरडवाहू शेतीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भातकाडाचे आच्छादन अनमोल ठरते.
Usache Pachat : उसाच्या पाचटाचे 'हे' तीन उपयोग फायदेशीर ठरतील, जाणून घ्या सविस्तर