Vegetable Farming : वेलवर्गीय भाजीपाला वेल सुकणे (Bhajipala Farming) ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेक कारणांमुळे होऊ शकते. यात पाणी, खत आणि रोगांचा समावेश आहे. वेल सुकल्यास, वेलीतील पाने पिवळी होऊन वाळू लागतात आणि वेलींची वाढ थांबते. परिणामी उत्पादनावर परिणाम होतो. या लेखातून वेल सुकू नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि सुकण्याची कारणे जाणून घेऊयात....
वेल सुकणे
वेलवर्गीय भाजीपाला पिके फळवाढीच्या (Fruit Farm) संवेदनशील अवस्थ्येमध्ये असताना असंतुलित अन्नद्रव्य व सिंचनाचे व्यवस्थापन, वातावरणाचा ताण यांमुळे मर रोगकारक बुरशीच्या प्रादुर्भावाला सहजपणे बळी पडतात. परिणामी वेल पिवळे पडतात व वाळून जातात.मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कार्बेडाझिम (५० डब्ल्यूपी) किंवा थायोफेनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची प्रतिझाड ५० ते १०० मिली याप्रमाणे आळवणी (ड्रेचिंग) करावी.
ही देखील कारणे आहेत?
- जास्त पाणी : वेलवर्गीय भाज्यांना जास्त पाणी दिल्यास, मुळे कुजतात आणि वेली सुकतात.
- पाणी कमी : वेलींना पुरेसे पाणी न मिळाल्यास, त्या सुकतात.
- खताचा अभाव : वेलींना आवश्यक खत न मिळाल्यास, त्या सुकतात.
- खताचा जास्त वापर : खताचा जास्त वापर केल्यास, वेलींना नुकसान होऊ शकते.
- वेलवर्गीय भाज्यांवर भुरी रोग लागल्यास, वेलीतील पाने पिवळी होऊन वाळतात.
- पाचोळा : वेलवर्गीय भाज्यांवर पाचोळा रोग लागल्यास, वेली सुकतात.
- तापमान : वेलवर्गीय भाज्यांना जास्त किंवा कमी तापमान मिळाल्यास, वेली सुकतात.
- सूर्यप्रकाश : वेलवर्गीय भाज्यांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास, त्या सुकतात.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी