भुईमुगाच्या काढणीच्या वेळी जमिनीत थोडी ओल असल्यास काढणीचे काम सोपे होते. शक्यतो काढणीच्या काळात ऊन भरपूर असल्यास काढणीचे काम चांगले होते. पुढे चांगले ऊन मिळेल म्हणून शेंगा काढणीस उशीर केला तर उपट्या जातीच्या शेंगातील दाण्यांना आतल्या आत मोड येऊ शकतात. तसेच पुढे अधिकच उशीर केला तर शेंगांना मोड फुटतात व त्यामुळे मोठे नुकसान संभवते. काढणी अगोदर शेंगा पक्व होऊन गेल्या असतील तर दाणे काळे पडतात व उत्पादनाची प्रत खालावून भाव कमी मिळतो. त्याकरीता भुईमुगाची काढणी योग्य वेळीच करणे अत्यंत आवश्यक असते.
काढणी लवकर केल्यास शेंगांमध्ये अपक्व दाण्यांचे प्रमाण जास्त राहते, त्यामुळे उत्पादन कमी येते. उत्पादनाची प्रत घटते. त्याशिवाय अशा शेंगातील दाण्यात तेलाचे प्रमाण कमी राहते. शेंगाची खूपच उशिरा काढणी केली गेल्यास जमीन टणक होऊन पुष्कळशा शेंगा जमिनीतच राहतात. त्या खणून काढाव्या लागल्याने काढणीचा खर्च वाढतो. भुईमुगाचे पीक काढणीस तयार झाले किंवा नाही हे पाहण्याकरता शेतातील ठिकठिकाणची झाडे उपटून शेंगा पक्व झाल्या किंवा नाही हे पहावेवेळेवर करा भुईमुगाची काढणे भुईमुगाच्या काढणीच्या वेळी जमिनीत थोडी ओळ असल्यास काढण्याचे काम सोपे होते. शक्यतो काढण्याच्या काळात ऊन भरपूर असल्यास काढण्याचे काम चांगले होते. पुढे चांगले गुण मिळेल म्हणून शेंगा काढणीस उशीर केला तर उपट्या जातीच्या शेंगातील जाण्यांना आतल्या आत मोड येऊ शकतात.
तसेच पुढे अधिकच उशीर केला तर शेंगांना मोड फुटतात. त्यामुळे मोठे नुकसान संबोधले काढणे अगोदर शेंगा पक्क होऊन गेले असतील तर दाणे काळे पडतात. उत्पादनाची प्रत खालावून भाव कमी मिळतो त्याकरता भुईमुगाची काढणे योग्य वेळीच करणे अत्यंत आवश्यक असते. काढणे लवकर केल्यास शेंगांमध्ये अपक्व दाण्याचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळे उत्पादन कमी येते उत्पादनाची प्रत घटते. त्याशिवाय अशा शेंगातील दाण्यात तेलाचे प्रमाण कमी राहते. शेंगाची खूपच उशिरा काढणे केली गेल्यास जमीन टनक होऊन पुष्कळच्या शेंगा जमिनीतच राहतात त्या खणून काढाव्या लागल्याने काढणीचा खर्च वाढतो. भुईमुगाचे पीक काढणीस तयार झाले किंवा नाही हे पाहण्याकरता शेतातील ठिकठिकाणी उपटून शेंगा पक्व झाल्या किंवा नाही हे पहावे, जेव्हा डहाळ्यास पक्व शेंगाचे प्रमाण जास्त दिसून येईल ती वेळ काढणीस योग्य आहे असे समजावे.
शेंगा परिपक्व झाल्याचे कधी समजावे....
यावेळी भुईमुगाची पाने पिवळी होऊन गळू लागतात. शेंगाची जेव्हा पूर्ण वाढ झालेली असते तेव्हा शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागते. शेंगातील दाणा पूर्णपणे भरलेला असल्यास व त्यावर चांगला रंग आलेला असल्यास शेंगा पूर्ण पक्व झाल्याचे समजण्यास हरकत नाही. पूर्णपणे पक्व झालेली शेंग हाताच्या बोटाने दाबली असता ती लवकर फुटत नाही, यावरून भुईमुगाचे पीक काढणीस आले की नाही हे ठरविता येते. उपट्या जातीचे वेल उभट वाढतात, त्यामुळे ते उपटून घेऊन हाताने शेंगा तोडून काढाव्यात. पस-या जातीचे वेल लहान कुळवावर उभे राहून फिरवून गोळा करावेत. नंतर जमिनीत असलेल्या शेंगा खोल कुळव चालवून किंवा खुरप्याने चाळण करून किंवा लाकडी नांगराच्या साह्याने नांगरून काढाव्यात. वेलाच्या शेंगा काढल्यावर त्या खळ्यावर ७ ते ८ दिवस चांगल्या वाळवाव्यात. शेंगा वाळवून साठवणुकीसाठी ठेवताना त्यामध्ये पाण्याचे प्रमाण ७ ते ८ टक्के असावे.
लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत