Lokmat Agro >स्मार्ट शेती > Soil Testing lab : तुम्हाला माती परीक्षण केंद्र सुरू करायचंय, कोण अर्ज करू शकतं? वाचा सविस्तर 

Soil Testing lab : तुम्हाला माती परीक्षण केंद्र सुरू करायचंय, कोण अर्ज करू शकतं? वाचा सविस्तर 

Latest news Where to apply for starting a soil testing station see details | Soil Testing lab : तुम्हाला माती परीक्षण केंद्र सुरू करायचंय, कोण अर्ज करू शकतं? वाचा सविस्तर 

Soil Testing lab : तुम्हाला माती परीक्षण केंद्र सुरू करायचंय, कोण अर्ज करू शकतं? वाचा सविस्तर 

तुमच्या गावासह इतर आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देऊ शकता. पाहुयात सविस्तर.... 

तुमच्या गावासह इतर आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देऊ शकता. पाहुयात सविस्तर.... 

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही वर्षांत शेती करणं अत्यंत जिकिरीचं झालं आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, शेतीमालास अपेक्षित भाव न मिळणं यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा मातीची गुणवत्ता देखील ढासळत असल्याने वेळोवेळी माती परीक्षण करणे गरजेचे झाले आहे. यासाठी आता तुम्ही स्वतः देखील माती परीक्षण केंद्र सुरु करून तुमच्या गावासह इतर आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देऊ शकता. काय आहे ही योजना पाहुयात सविस्तर.... 

केंद्र सरकारने माती परीक्षण केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, पंचायत स्तरावर लहान माती परीक्षण केंद्रे उघडण्यासाठी ही योजना काम करते. या लॅबमध्ये पंचायत आणि आजूबाजूच्या गावांच्या शेतातील मातीची चाचणी केली जाते. विशेष म्हणजे दोन प्रकारची माती परीक्षण केंद्रे आहेत. पहिली म्हणजे स्थावर माती परीक्षण प्रयोगशाळा. म्हणजे दुकान भाड्याने घेऊन माती परीक्षण केंद्र सुरू करू शकता. हे दुकान तुम्ही गावातही सुरू करू शकता. तर दुसरी मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या अंतर्गत, तुम्हाला एक वाहन खरेदी करावे लागेल, ज्यामध्ये माती परीक्षण केंद्राची सर्व उपकरणे ठेवता येतील. या वाहनाद्वारे तुम्ही गावोगावी जाऊन माती परीक्षण करू शकता.

बहुतांश शेतकरी शेती करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेत नाहीत. अशा परिस्थितीत शेतात पोषक तत्वांचा अभाव असल्याने अनेक वेळा उत्पादन चांगले येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे प्रत्येक गावात माती परीक्षण केंद्रे उघडली तर शेतकऱ्यांची शेती करण्याआधी माती परीक्षण करणे सहज शक्य होईल. एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मातीची चाचणी घ्यायची असेल तर त्याला त्याच्या शेतातील माती चाचणी केंद्रावर न्यावी लागेल. माती परीक्षण केल्यानंतर, तुम्हाला शेतकरी केंद्रातून छापील निकाल मिळेल. त्याचबरोबर माती परीक्षणाचे शुल्क प्रति नमुन्यासाठी 300 रुपये असेल. अशा प्रकारे गावात हा व्यवसाय उघडून तुम्ही महिन्याला 15 ते 20 हजार रुपये सहज कमवू शकता.


कोण अर्ज करू शकतं ? 

मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत केवळ 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक मिनी माती परीक्षण केंद्रे उघडू शकतात. तसेच, लाभार्थ्यांसाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय त्याला कृषी चिकित्सालय आणि शेतीविषयी चांगले ज्ञान असावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि लघु माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन  घ्यावी लागेल. 

या वेबसाईटला नक्की भेट द्या... 

माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी सुरवातीला शासनाच्या soilhealth.dac.gov.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेता येईल. सर्व प्रथम कृषी अधिकारी तुम्हाला भरण्यासाठी एक फॉर्म देतील. तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती कृषी विभागाकडे जमा करावी लागतील.

Web Title: Latest news Where to apply for starting a soil testing station see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.