Join us

फळपिकांत बुरशीजन्य रोगापासुन बचावात्मक उपायासाठी जालीम मिश्रण

By बिभिषण बागल | Published: August 01, 2023 10:16 AM

पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिश्रण व बोर्डो मलम याचा वापर फायदेशीर आहे.

भारतात फळपिकांपासून मिळणाऱ्या उत्पादनात लिंबुवर्गिय फळपिकांचा फार मोठा वाटा आहे. व्यापारीदृष्ट्या संत्रा हे फळपिक अत्यंत महत्वाचे आहे. नागपूरची संत्री अतिशय लोकप्रिय आहे. विदर्भात एकुण संत्रा फळपिकाखालील क्षेत्र असुन, मोसंबी व लिंबु या फळपिकाखालील क्षेत्र क्रमषः आहे.

परंतु मागील पाच सहा वर्षापासून लिंबुवर्गिय फळपिके म्हणजेच संत्रा, मोसंबी आणि लिंबु याखालील क्षेत्रात लक्षणीय घट झालेली दिसून येत असून ह्याची विविध कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारे विविध रोग जसे खैऱ्या, विषाणुजन्य मंदऱ्हास, जलदऱ्हास बुरशीजन्य पायकुज, मुळजुक, शेंडेमर आणि डिंक्या होय. ह्या बुरशीजन्य रोगापासुन बचावात्मक उपाय म्हणजेच बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रण यांचा उपयोग करणे होय.

पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिश्रण व बोर्डो मलम याचा वापर फायदेशीर आहे. बोर्डो मिश्रणाचा उपयोग द्राक्षावरील केवडा, बटाट्याचा करपा, संत्र्यावरील शेंडेमर, टमाट्याचा करपा, पानवेलीवरील मर इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो.

बोड्रॅक्स मिश्रण म्हणजे काय?मोरचुद (कॉपर सल्फेट), चुना (कॅल्शियम हायड्रॉक्साइड) आणि पाणी यांच्या प्रमाणशीर मिश्रणास बोड्रॅक्स मिश्रण असे म्हणतात.

बोड्रॅक्स मिश्रण तयार करण्याची पध्दतताम्रयुक्त रासायनिक बुरशीनाशकांमध्ये मध्ये बोड्रॅक्स मिश्रण फार जुने गणले जाते. पिकांवरील अनेक रोगांच्या व्यवस्थापना करिता बोड्रॅक्स मिश्रण उपयोगात आणले जाते.

उपयोगया मिश्रणाचा उपयोग मुख्यतः फळबागांमध्ये रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक म्हणुन वापर करतात. संत्रा, मोसंबी, द्राक्ष, आंबा, चिकू, बोर इत्यादी फळवर्गीय पिकावरील बुरशीजन्य रोग जसे डिंक्या, अँथ्रकनोज, करपा, पानावरील ठिपके इत्यादी रोगांच्या व्यवस्थापनासाठी करण्यात येतो.

बोड्रॅक्स मिश्रणाचे रासायनिक पृथ:करण- मोरचुद, चुना आणि पाणी असे बोड्रॅक्स मिश्रणाचे प्रमुख घटक आहे. यातील मोरचुदाचे द्रावण हे आम्लधर्मी आणि चुन्याचे द्रावण हे विम्लधर्मी असते तर पाणी हे उदासीन किंवा किंचीत विम्लधर्मी असते मात्र तयार होणारे बोड्रॅक्स मिश्रण उदासीन किंवा किंचीत विम्लधर्मी असावे लागते.हे मिश्रण तयार करण्यासाठी लाकडी किंवा माती किंवा प्लास्टिक भांडी वापरावीत. मोरचुदाचे द्रावण हे लोखंडी अथवा तांब्या पितळीच्या भांड्यात रासायनिक क्रिया घडवून आणते. त्यामुळे अशा प्रकारच्या भांड्यात बोड्रॅक्स तयार करू नये किंवा असे भांडे वापरू नये.- या मिश्रणाचा सामु हा ७ ते ७.२ असणे आवश्यक आहे. मिश्रणाचा सामु हे ७.५ पेक्षा जास्त होऊ देऊ नये अन्यथा हे मिश्रण बुरशीनाशक म्हणुन निरूपयोगी ठरते. बोड्रॅक्स मिश्रण तयार करतांना वेगवेगळ्या प्रमाणात मोरचूद आणि चुना यांचे प्रमाण घेवून वेगवेगळ्या तीव्रतेचे बोर्डोक्स मिश्रण वापरतात.

१ टक्का तिव्रतेचे १०० लिटर मिश्रण तयार करण्याची पद्धत

सहित्ययामध्ये प्लॅस्टिकची बादली किंवा मातीचे मडके/भांडे अंदाजे १५-२० लिटर मापाचे, २०० लिटर प्लॅस्टिक ड्रम गर्द निळ्या रंगाचे मोरचूद १ किलो, कळीचा चुना १ किलो, आम्ल-विम्ल निर्देशांक कागद (लिटमस पेपर) किंवा लोखंडी खिळा अथवा पट्टी, क्षारविरहित स्वच्छ पाणी, ढवळण्याकरिता लाकडी काठी, गाळण्याकरिता कापड इत्यादी.

कृती१) गर्द निळ्या रंगाचे स्फटिकासारखे १ किलो मोरचुद घ्यावे. त्यानंतर मोजलेल्या मोरचुदची बारीक पूड करावी. एका प्लॅस्टिकच्या बादलीत १० लिटर पाणी घेवून मोरचुदाची बारीक पुड विरघळण्यास टाकावी.२) उच्च प्रतिचा १ किलो कळीचा चुना घ्यावा. आणि दुसऱ्या प्लॅस्टिकच्या बादलीत १० लिटर पाणि घेवून चुना विरघळू द्यावा.  ३)चुन्याचे द्रावण पातळ कापडातून गाळून घ्यावे आणि तिसऱ्या बादलितओतावे. आवश्यकता वाटल्यास मोरचुदाचे द्रावण सुद्धा गाळुन घ्यावे.४) चुन्याचे द्रावण थंड झाल्यानंतर मोरचुद व द्रावण एकत्रितरित्या वेगळ्या भांडयात एकत्रिक ओतावे आणि ओतत असतांनी ते लाकडी काठीने सतत ढवळावे.५) दोन्ही द्रावणे एकत्र केल्यानंतर चांगली ढवळावी आणि नंतर द्रावण २०० लिटर मापाच्या प्लॅस्किच्या ड्रमात ओतावे. आणि त्यामधे उरलेले ८० लिटर पाणी द्रावणात टाकून ते लाकडच्या काठीने ढवळावे.६) अशाप्रकारे एकुण १०० लिटर द्रावण तयार होईल तयार झालेल्या मिश्रणाचा रंग आकाशी होतो.७) तयार झालेले द्रावण फवारणीस योग्य आहे किंवा नाही तपासण्याकरिता म्हणजेच मिश्रणाची उदासीनता चाचणी घेण्यासाठी द्रावणत तांबडा लिटमस कागदाचा तुकडा बुडवावा. तो जर निळा झाला तर मिश्रणात अधिक थोडे चुन्याचे द्रावण ओतावे. लिटमस कागद नसल्यास लोखंडी खिळा किंवा पट्टी टाकावी. खिळा किंवा पट्टी यावर तांबुस थर चढला तर द्रावण आम्ल झाले असे समजून त्यात वरील प्रमाणे चुन्याची निवळी ओतावी आणि आम्लपणा नाहिसा करावा. अशाप्रकारे तयार झालेले द्रावण फवारणीसाठी वापरावे.

निरनिराळ्या तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यास लागणारे मोरचुद, चुना आणि पाणी यांचे प्रमाण तक्त्यात दिले आहे.

अ.क्रद्रावणाची तीव्रता (%)मोरचूद (ग्रॅम)चुना (ग्रॅम)पाणी (लि.)
१०००१०००१००
०.८८००८००१००
०.६६००६००१००
०.४४००४००१००
०.२२००२००१००

एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी साठी ५०० लिटर पाण्याची गरज भासते. अशावेळेस वरील तक्त्यानुसार १ टक्के तीव्रतेच्या मिश्रणासाठी प्रत्येकी ५ किलो मोरचुद, ५ किलो चुना व ५०० लिटर पाण्यासाठी वापरावा.

डॉ. ई. डी. बागडे, स. प्राध्यापक (रोगशास्त्रज्ञ)डॉ. पी. एन. दवणे, स. प्राध्यापक (किटकशास्त्रज्ञ)डॉ. मेघा डहाळे (उद्यानविद्यावेत्ता)प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल, जि. नागपुर

अधिक वाचा: सेंद्रिय शेतीकडे वाढतोय कल; ह्या खताच्या उत्पादनातून कमवा बक्कळ पैसा

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापन