Join us

मातीतले पोटॅशियम टिकवण्यासाठी संशोधकांनी सुचविले हे ६ उपाय, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:00 PM

मातीतील पोटॅशियम होतेय कमी; नवीन संशोधनात माहिती समोर

पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचे पोषक तत्त्व असलेले पोटॅशियम दिवसेंदिवस मातीतून कमी होत आहे. यामुळे आपण यापुढे प्रत्येकासाठी पुरेसे अन्न तयार करू शकणार नाही. मात्र, अद्याप उशीर झालेला नाही. नवीन अभ्यासानुसार, पुरेशा प्रमाणात पोटॅशियम मातीत राहण्यासाठी संशोधकांनी ६ उपाय सुचविले आहेत.

पिकांच्या वाढीसाठी वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस तसेच पोटॅशियम आवश्यक असते. नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या तुलनेत पोटॅशियम मातीत अतिशय कमी शिल्लक आहे. जगभरातील सुमारे २० टक्के शेतातील मातीत पोटॅशियमची कमतरता आहे. पूर्व आशिया, आग्नेय आशिया, लॅटिन अमेरिका आणि उप-सहारा आफ्रिकेतील मातीत प्रामुख्याने पोटॅशियमची कमतरता आहे.

उत्पादनात होतेय घट

चीनच्या सुमारे ७५ टक्के 3 भातशेतीच्या मातीत आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या गव्हाच्या पट्ट्यात ६६ टक्के शेतीत पुरेसे पोटॅशियम नाही. भारतात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पीक उत्पादनात घट झाली आहे.

जमिनीत अधिक पोटॅशियम टाकून समस्या सोडवणे  सोपे वाटत असले, तरी ते तितके सोपे नाही. पोटॅशियम सामान्यतः पोटॅशमधून काढले जाते. स्फटिकासारखे हे खनिज भूगर्भातील खडकाच्या थरांमध्ये आढळते. जगातील साठा मूठभर देशांमध्ये आहे. यामुळे बहुतेक इतर देश आयातीवर अवलंबून आहेत. ज्यामुळे शेती उत्पन्नावर परिणाम होत आहे.

पोटॅशियम का महागलेय ?

  • खतांची वाढती मागणी
  • कोरोना नंतरच्या आर्थिक सुधारणा
  • रशिया युक्रेन युद्ध
  • इंधनाच्या वाढत्या किमती
  • बेलारूस वरील निर्बंध 

कोणत्या देशाकडे पोटॅशचा साठा ?

  • पोटॅशचा साठा कॅनडा बेलारूस आणि रशियामध्ये सर्वाधिक आहे.साधारण 70 टक्के साठा या भागात असून पोटॅशच्या 80% उत्पादनात चीन सोबत कॅनडा बेलारूस आणि रशिया अग्रेसर आहेत. 
  • 2000 नंतर पोटॅशच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 2009 मध्ये प्रथमच त्याच्या किमती तिपटीने . त्यानंतर 2021 च्या युद्ध आणि इतर कारणांमुळे या किमती वाढतच . परिणामी, 2021 च्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये पोटॅशियम सहा पटीने महाग झाले होते . 

पोटॅशियमसाठी काय करावे ?

  • किमतीतील चढउतारांचा अंदाज अगोदरच घ्यावा
  • सध्याच्या पोटॅशियम साठा आणि किती लागणार आहे याचे पुनरावलोकन करावे
  • जमिनीत आधीच किती पोटॅशियम शिल्लक आहे त्यानुसार शेतकऱ्यांना पिके घेण्यास सांगणे
  • पर्यावरणावर काय परिणाम होत आहे याचा अभ्यास
  • वर्तुळाकार पोटॅशियम अर्थव्यवस्था तयार करणे
  • सरकारमधील अधिक सहकार्य
टॅग्स :शेती क्षेत्रअन्नशेतकरी