प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेंतर्गत, लाभार्थ्यांना विनातारण कर्ज, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास सहाय्य प्रदान केले जाते. नोंदणीकृत पात्र कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण, टूलकिट प्रोत्साहन अनुदान म्हणून १५ हजार आणि २ लाखापर्यंत सवलतीच्या व्याजदराचे कर्ज मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अवजारे व विविध साधनांचा वापर करणारे कारागीर आणि हस्तकलेच्या कारागिरांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अंमलात आली. या योजनेचा कसा लाभ घ्यायचा?
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं
आधार कार्डमतदार ओळखपत्रव्यवसायाचा पुरावामोबाईल नंबरबँक खाते तपशीलउत्पन्नाचा दाखलाजात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
काय मिळतात लाभ?
- जे कारागीर या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रदान केले जाते. त्यांना पाच ते सात दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि दररोज ५०० रुपये स्टायपेंडसह १५ दिवस प्रगत प्रशिक्षण देण्यात येते.
- मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला पात्र लाभार्थींना ई-व्हाउचरच्या स्वरूपात 15,000 पर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाते.
- 5% व्याजाच्या सवलतीच्या दराने अनुक्रमे 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसह 1 लाख आणि 2 लाख रुपयांच्या दोन टप्प्यांत 3 लाख रुपयांपर्यंतचे संपार्श्विक 'एंटरप्राइझ डेव्हलपमेंट लोन' देखील मिळतात.
कुठे कराल अर्ज
या योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थ्याला पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. पात्र कारागीरांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या सीएससी केंद्रात ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून कळविण्यात आले.
विद्यावेतनासह २ लाखांपर्यंत कर्ज
योजनेंतर्गत पारंपरिक कारागीर म्हणून शासनाची मान्यता, प्रमाणपत्र व ओळखपत्र, कौशल्य पडताळणीनंतर प्रशिक्षण, प्रशिक्षणादरम्यान दैनंदिन ५०० रुपये विद्यावेतन, १५ हजार रुपये टूलकिट प्रोत्साहन, १ व २ लाखांचे कर्ज आदी लाभ देय आहेत.
कोण घेऊ शकतो लाभ?
सोनार, कुंभार, मोची, गवंडी, मॅट व झाडू निर्माता, बाहुली व खेळणी निर्माता, न्हावी, माला निर्माता, परीट, शिंपी, मासेमारी जाळी बनविणारे कारागीर योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.